HomeUncategorizedसंस्कृती महिला ग्रामसंघ देवकांडगांवच्या.- वनअमृत प्रोजेक्टला जिल्हाधिकारी मा. येडगे यांची भेट.

संस्कृती महिला ग्रामसंघ देवकांडगांवच्या.- वनअमृत प्रोजेक्टला जिल्हाधिकारी मा. येडगे यांची भेट.

संस्कृती महिला ग्रामसंघ देवकांडगांवच्या.- वनअमृत प्रोजेक्टला जिल्हाधिकारी मा. येडगे यांची भेट.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील संस्कृती महिला ग्रामसंघ देवकांडगांव येथील वनअमृत प्रोजेक्टला जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे यांनी सदिच्छा भेट देऊन या प्रोजेक्टची माहिती घेतली. या ग्राम संघाच्या महिलांनी जंगलातील रानटी फळासह जुन्या भात जाती जतन ठेवल्या आहेत. शासनाचा हा वन अमृत प्रोजेक्ट व यामध्ये प्रामुख्याने आजरा तालुक्यातील देवगडगाव येथील महिलांनी मोठ्या प्रमाणात व उत्कृष्ट पद्धतीने हा प्रोजेक्ट केला आहे.


यामध्ये जुनी भातवान जाती, नाचणी जांभुळ, काजू, यांचे सिरम तयार केले आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या कृषी प्रदर्शनामध्ये येथील संस्कृती महिला ग्राम संघ सहभाग घेत असतो. त्याचे कौतुक जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे यांनी केले.

या प्रोजेक्टला भेट देताना उपविभागीय अधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार समीर माने, तसेच गावातील तलाठी कोतवाल, आजरा तालुका गट समन्वय शांताराम कांबळे, ग्राम संघाच्या महिला अर्चना देसाई, दिपाली गुरव, स्वप्नाली राणे, गीता देसाई, पूनम देसाई, रेश्मा राणे, शामल देसाई, आकांशा देसाई सह ग्राम संघाच्या सर्व महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अर्चना देसाई यांनी जिल्हाधिकारी यांचे स्वागत केले दिपाली गुरव यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.