🛑अपंगांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी चंदगड यांना निवेदन देऊन चर्चा – मुक्ती संघर्ष समिती.
🛑आरदाळ- पेढारवाडी भेरीदेव यात्रेनिमित्त स्लो मोटरसायकल स्पर्धा संपन्न.
🛑केंद्रशाळा भडगाव शाळेच्या विषयशिक्षिका रेखा नाईक यांना ( राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार जाहिर. )
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

जागतीक महिला दिनानिमित्त माहसेवा फाउंडेशन ठाणे यांच्या संयुक्त ध्येय मराराष्ट्र देण्यात येणारा राज्यस्तरीय कहत्त्ववान महिला पुरस्कार २०२३ प्रदान केंद्रशाळा भडगाव शाळेच्या विषयशिक्षिका सो रेखा आप्पासाहेब नाईक यांना जाहिर झाला आहे. गडहिंलज रेणूका सामाजिक तालुक्यातील व शैक्षणिक चन्नकुणी गावच्या सेवा संस्थेच्या त्या संस्थापक अध्यक्षा आहेत. त्यांचे शैक्षणिकव
सामाजीक काम खूप मोठे आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे यात व्यस विदयार्थ्यांसाठी शैक्षणिक
उपक्रमासोबतच बतच अंधश्रद्धा निर्मुलन, बेरोजगारी महिला सक्षमीकरण, बचत गट स्थापना किशोखीन मुलामुलीना मार्गदर्शन, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, नातील अडचणी सोडवणूक, दाम्पत्य जीवनातील निराधार मुले, वयोवृदर्थचिदिखभाल हया त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले.

🛑आरदाळ- पेढारवाडी भेरीदेव यात्रेनिमित्त स्लो मोटरसायकल स्पर्धा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी

आजरा ता. येथील आरदाळ / पेढारवाडी भेरीदेव यात्रेनिमित्त आरदाळ येथे स्लो मोटर सायकल रेस स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धा उत्साहात व शांततेत पार पडली. या स्पर्धेचे उदघाटन प्राथमिक विद्यामंदिर आरदाळचे मुख्याध्यपक लक्ष्मण सुतार सर यांच्या हस्ते करण्यात आले. ऍड. सुशांत पोवार, लोककला मोहसत्व कमिटी संपर्क प्रमुख गणपती नागरपोळे, डॉ. पोवार चॅरीटेबल ट्रस्ट अँड फौंडेशन व विद्यार्थी विकास परिषदचे अध्यक्ष डॉ. एस.जी. पोवार, आनंद चव्हाण, सौरभ वेसणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती..स्वागत व प्रास्ताविक सचिन पोवार यांनी करून स्पर्धेचे नियम व अटी सांगितल्या.
चौकट
स्पर्धेचा निकाल.
प्रथम क्रमांक
१) किशोर तरवाळ(चंदगड)
२) सार्थक बेलेकर( कागल ) ३)अनिकेत बारदेस्कर (उत्तूर )
४) नितीन ससाने (आरदाळ)
७०१/- रुपये व ट्रॉफी
५०१/- रुपये व ट्रॉफी
३०१/- व ट्रॉफी व उत्तेजनार्थ २०१/- अशी बक्षीसे देण्यात आली तर स्पर्धकना मोफत प्रवेश देण्यात आलं स्पर्धेत गावातील व यात्रेकरूनी २० लोकांनी स्पर्धात भाग घेतला. उदघाटक मुख्याधपक सुतार म्हणाले ही स्पर्धा घेऊन डॉ. पोवार फौंडेशनणे युवकांनी स्लो मोटरसायकलं चालवावी असा जणू आगळा वेगळा नियमचं घालून दिला. असे मत व्यक्त केले. स्पर्धेसाठी अक्षय ससाने, कपिल आजगेकर , यांनी पचं म्हूणन काम पाहिले.यावेळी सुभाष मांडे, तुषार घोरपडे, नेताजी पाटील, विनायक कांबळे, रवि पाटील, सचिन नाईक, तेजस केगार, धनराज कदम आदि परिषदचे व फौंडेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.

🛑अपंगांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी चंदगड यांना निवेदन देऊन चर्चा – मुक्ती संघर्ष समिती.
चंदगड.- प्रतिनिधी.

मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने खालील अपंगांच्या-दिव्यांगांच्या बाबतीतील सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून कायदेशीररित्या त्याची ताबडतोब सोडवून करावी.अपंगांच्या न्याय्य हक्क मागण्यांसाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी चंदगड यांना निवेदन देऊन चर्चा केली. याबाबतीत तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठीचे आश्वासन दिले.हे झाले नाहीतर आम्ही याबाबतीत आपल्या चंदगड तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. असा इशारा ही देण्यात आला आहे.
खालील मागण्यांच्या बाबतीत मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने दिव्यांग- अपंगांना देण्यात येणाऱ्या पेन्शन योजनेबाबतीत त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात वेळोवेळी आणि वेळच्या वेळी जमा झाली पाहिजे. यासाठी दिव्यांगांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. यासाठी आपण दिव्यांगांच्या पेन्शन बाबतीत जे अडथळे आहेत ते दूर करून त्यांची पेन्शन जर महिन्याला त्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा झाली पाहिजे. तशीच दिव्यांगांच्या इतर मागणीबाबत आपण लक्ष घालून संबंधित सर्व विभागांना याबाबतीत सूचना करून याबाबतीतील बैठक लावून संघटनेबरोबर चर्चा करून या प्रश्नाची सोडवणूक करायला हवी आहे.
या निवेदनातील मागण्या
आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील अपंगांना/दिव्यांगांच्या पेन्शनची रक्कम वेळच्या वेळी त्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे, सरसकट अपंगांना दिव्यांगांना अंत्योदय कार्ड मिळालेच पाहिजे, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीतील सन २०१४/१५ व २०२३/२४ या आर्थिक वर्षात शासन निर्णयानुसार तरतूद करण्यात आलेला ५ % राखीव निधी त्याचा ताबडतोब अनुशेषासह परिपूर्ण विनीयोग झालाच पाहिजे. तसेच दिव्यांग / अपंग कल्याणनिधी शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्यासाठी सर्व संबंधीत लाभार्थ्यांना वाटप न झालेला निधी ताबडतोब वाटप केला पाहिजे., प्रत्येक ग्रामपंचायतीने घरफळामध्ये ५० टक्के सवलत दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबाला आहे. ती सवलत दिली पाहिजे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे.
अपंगांना/ द्विव्यांगांना शासनाच्या मालकी जागेत व्यवसाय करण्यासाठी दुकान गाळे प्राधान्यक्रमाने दिलेच पाहिजेत. ज्या गावात दुकान गाळे शासनाच्या व ग्रामपंचायतीच्या मालकीचे आहेत. तेथे अपंगांना/ दिव्यांगांना दुकान गाळे प्राध्यान्य क्रमाने दिले आहेत का नाही? याची चौकशी झाली पाहिजे.,
भूमिहीन दिव्यांगांना किंवा अपंगांना गायरान मध्ये अथवा गावठाण मध्ये जागा देऊन त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे.
वरील मागण्यांच्या यासंदर्भात ठोस पावले प्रशासनाने गांभीर्यपूर्वक उचलली नाहीत.आंदोलन करणार आहोत.असा इशारा मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी मुक्ती संघर्ष समितीच्या राज्याध्यक्ष संग्राम सावंत, ज्योतिबा गोरल, संगीता आवडन संदीप गावडे, अण्णाप्पा गोरल, नामदेव पाटील, मारुती व्हन्याळकर, अशोक गंगली लक्ष्मण कुंभार, सतीश कांबळे, परशुराम नाईक, व इतर दिव्यांग अपंग बांधव उपस्थित होते.