गडहिंग्लज प्रांताधिकारीपदी मल्लिकार्जुन माने यांची नियुक्ती.
गडहिंग्लज :- प्रतिनिधी.
जिल्ह्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांची गडिंग्लज प्रांत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर गडहिंग्लज प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांची मुद्रांक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांची आज घोषणा करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील या दोन अधिकाऱ्यांची बदली झाली. यापूर्वी सातारा, ठाणे व अलिबाग या ठिकाणी कार्यरत होते. मूळचे जत तालुका उमली या गावचे आहेत.