HomeUncategorizedआजरा नगरपंचायतने भरमसाठ लावलेला वाढीव कर रद्द करावा.- अन्यथा नगरपंचायत समोर धरणे...

आजरा नगरपंचायतने भरमसाठ लावलेला वाढीव कर रद्द करावा.- अन्यथा नगरपंचायत समोर धरणे आंदोलन करण्यात येतील – आजरा नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष व भाजप तालुका अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर यांचा नगरपंचायतला निवेदनातुन इशारा.

आजरा नगरपंचायतने भरमसाठ लावलेला वाढीव कर रद्द करावा.- अन्यथा नगरपंचायत समोर धरणे आंदोलन करण्यात येतील – आजरा नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष व भाजप तालुका अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर यांचा नगरपंचायतला इशारा.

आजरा.- प्रतिनिधी.

आजऱ्याचे माजी उपनगराध्यक्ष व भा. ज.पा. आजरा तालुका अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांच्या नेतृत्वाखाली व आजरा शहरातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने वाढीव घर फाळा रद्द व्हावा. याबाबत आजरा नगर पंचायत प्रशासकीय अधिकारी चौगुले यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आपन आजरा शहरातील रहिवाशांना नोटीस दिला आहात यामध्ये असे म्हटला अहात.
आजरा नगरपंचायत, आजरा यांनी आपल्या मालकीच्या इमारतीवर, खुले भूखंड अथवा भाडेकरूकडून घेण्यात येणाऱ्या भाड्यावर मालमत्तेची जागेवर मोजणी व तपासणी करून कर आकारणी प्रस्तावित केली आहे.

याबाबतीत इमारतीचे किंवा जागेचे भांडवली मूल्य (Capital value) अथवा करआकारणी मध्ये (Assessment) तसेच नावात काही चुक असल्यास, त्याबाबत आपली कोणतीही तक्रार, हरकत असल्यास, सदर कारणे नमूद करून योग्य / सक्षम पुराव्यासह ती लेखी मा. मुख्याधिकारी, आजरा नगरपंचायत, आजरा यांचेकडे, यादीचे जाहीर प्रकाशन केलेल्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत आजरा नगरपंचायत, आजरा येथे द्यावी, व त्याची पोचपावती घ्यावी. वरील मुदतीत आपल्याकडून विधिग्राह्य लेखी हरकत अर्ज प्राप्त न झाल्यास, प्रस्तावित केलेली कर आकारणी आपणास मंजूर आहे .असे समजण्यात येवून यापुढे आपली याबाबत कोणतीही तक्रार दाखल करून घेण्यात येणार नाही. किवा ऐकली जाणार नाही, आपले नावे नगरपंचायतद्वारा केलेली प्रस्तावित कर आकारणी कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
वरील वर्षाकरीता केलेली कर आकारणी पाहावयाची असल्यास आपणास किंवा आपण नियुक्त केलेल्या अभिकर्त्यास कार्यालयीन वेळेत स्वतःच्या मालकीचे इमारत व जागेवरील करआकारणी चा तपशील नगरपंचायत कार्यालयात कर संग्राहकाकडे कार्यालयीन वेळेत पाहावयास मिळेल, तसेच कारण व पुराव्यासहित विधिग्राह्य लेखी आक्षेप अर्ज विहीत नमुन्यात कार्यालयीन वेळेत स्विकारले जाणार आहेत..
अनाधिकृत बांधकामांना मालमत्ता कराची आकारणी केल्यामुळे अनाधिकृत बांधकाम नियमित झाले असे समजण्यात येऊ नये, मालमत्ता कराच्या आकारणीमुळे नगरपंचायत कायद्याने असलेल्या अनाधिकृत बांधकामाविरुद्ध करावयाच्या कायदेशीर कार्यवाहीस किंवा हक्कास कोणतीही बाधा येत नाही.

सन २०२३-२४ व त्यापुढे सुधारित करआकारणी नुसार बिले देण्यात येणार आहेत.

मालमत्तेच्या मोजमापात व वापरात बदल आढळून आल्यास त्यानुसार कर आकारणीत बदल होऊ शकतो.
उपरोक्त मालमत्तेचा मालकी हक्क शासकीय जमिन, इमला, नझुल, सरकारी जागा इ. असल्यास मालमत्ता धारकाचे नाव भोगवटादार म्हणुन संबोधण्यात येईल. उपरोक्त प्रमाणे मालमत्तेच्या मालकी हक्काच्या नोंदीत मालमत्ता सर्व्हेक्षणाच्या नोंदीत अथवा करमुल्यनिर्धारणात कुठलीही त्रुटी असल्यास, कुठलीही पूर्व सुचना न देता दुरुस्ती करण्याचे अधिकार महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम १२३ अन्वये मुख्याधिकारी यांच्या द्वारे राखून ठेवण्यात येत आहे.
सदर देयकातील मालमत्ता धारकाचे नाव व भोगवटादाराचे नाव हे केवळ प्रस्तावित कर आकारणी करिता मर्यादीत असुन यास मालकी हक्का संबधातील पुरावा अथवा दस्त म्हणुन गृहीत धरु नये.
सदर नोटिस मध्ये मानवी अथवा संगणकीय चूका असल्यास सुधारित नोटीस देण्याचे अधिकार राखून वरील नोटिस बजावण्यात येत आहे. (टीप – मालमत्ता धारकाच्या नावात बदल किवा त्रुटी असल्यास लेखी अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्र जोडावेत.) खरेदीखत नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे
१) सिटी सर्वे /सात-बारा उतारा झेरॉक्स २) ५रु कोर्ट फी तिकीट ३) इंडेक्स-२ झेरॉक्स ४) हमीपत्र (फ्लॅट धारकांसाठी) ५) सोसायटीचे प्रमाणपत्र व नकाशा ६) खरेदी खताचे दोन प्रत ७) कर भरलेली पावती ८) या नोटिसची झेरॉक्स, सर्व कागदपत्रे दोन प्रतीत / सत्यप्रत, कोणतेही कागदपत्र नोटरी चालणार
नाही.
अशा आशयाची नोटीस आजरा शहरातील जागा मालक रहिवासी यांना देण्यात आले आहे. व नगरपंचायतने दिलेल्या नोटिसात म्हटले आहे.
यामुळे आजरा गावच्या व सध्याच्या शहराच्या इतिहासात ही पहिली व तीही इतक्या मोठ्या प्रमाणात सक्तीची कर वसुली वाढ करून जनतेवर अन्याय केला आहे
यामुळे येथील स्थानिक रहिवासी इतक्या मोठ्या रकमेमुळे भयभीत झाले आहेत. याबाबत दिलेला आदेश रद्द करण्यात यावा व ही इतकी मोठी कर आकारणी कोणत्या आधारे कशी काय होऊ शकते याचा जाब आजरा नगरपंचायत व आजरा शहरात याबाबत मोठे आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर अनिरुद्ध केसरकर, गौतम भोसले, सलीम माणगावकर,
सह आजरा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.