HomeUncategorizedबाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई / नुकसानीचे प्रस्ताव ऑनलाईन करण्याची जबाबदारी आजरा वन विभागाची....

बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई / नुकसानीचे प्रस्ताव ऑनलाईन करण्याची जबाबदारी आजरा वन विभागाची. – जंगली जनावरांच्या प्रश्नाबाबत बैठक संपन्न.

बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई / नुकसानीचे प्रस्ताव ऑनलाईन करण्याची जबाबदारी आजरा वन विभागाची. – जंगली जनावरांच्या प्रश्नाबाबत बैठक संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यात वन्य प्राण्यापासून होत असलेल्या नुकसानीबाबत श्रमिक मुक्ती दल व शेतकरी वन हक्क संघर्ष यांच्या वतीने काढलेल्या मोर्चाची दखल घेऊन बुधवार दि ४ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य वनसंरक्षक उपवन सरांक्षक जी गुरुप्रसाद यांच्या व तालुका वनाधिकारी स्मिता डाके यांचे उपस्थितीत आजरा वनविभाग कार्यालय येथे सोबत जंगली जनावरांच्या प्रश्नाबाबत बैठक संपन्न झाली. श्रमिक मुक्ती दल व शेतकरी वन हक्क संघर्ष समिती यांच्या वतीने कॉम्रेड संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या त्या मागणीप्रमाणे उपवन सरांक्षक जी गुरुप्रसाद यांच्या समोर प्रत्येक मागणीची सोडवणूक करण्यात आली यामध्ये हत्ती गवे वन्यप्राणी संघर्ष थांबवायचा असेल तर जंगल समृद्ध करून वन्यप्राण्याला जंगलातच ठेवा पण त्याच्या उपजीविकेचे साधन निर्माण करावे लागेल, यासाठी वन विभागाने संत गतीने कामकाज करून निर्णय होणार नाही सदर प्रस्ताव मुख्य वनरक्षक व मंत्रालयाकडे पाठवावा कारण जंगल म्हणजे फक्त झाडे नसून यामध्ये वन्य प्राण्यांना करण्यासाठी कुरण देखील असावा लागतो ते वनविभागाने केलेले नाही याबाबत विचार व्हावा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई झालेल्या पिकाला शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी नुकसान भरपाई तीस दिवसात मिळावी यासाठी वन विभागाने नुकसान भरपाई चे शेतकऱ्यांनी जमा केलेले प्रस्ताव ऑनलाइन स्वतः करावे धनगर वाड्यावरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे. अशा वेगवेगळ्या वन्य प्राण्याच्या नुकसानीबाबत व जंगल जपण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्या या चर्चेला उत्तर देताना उप वनरक्षक अधिकारी श्री गुरुप्रसाद आपल्या काही महत्त्वाच्या अन्य प्रश्न बाबत जिल्हा पातळीवर मुख्य वनरक्षक यांच्याशी बैठकीचे आयोजन करण्यात येईल नुकसान भरपाई चे प्रस्ताव व प्रस्तावासोबत लागणारी कागदपत्रे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या विभागातील वनरक्षक कर्मचारी यांच्याकडे जमा करावेत आपली कागदपत्रे योग्य असल्यास आपल्याला तीस दिवसात नुकसान भरपाई देण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील राहील धनगर वाड्यावरील प्रलंबित योग्य प्रश्नाबाबत आपल्या विभागाकडून लागणारी मदत केली जाईल यामध्ये नियमबाह्य प्रलंबित प्रश्नाचा विचार केला जाणार नाही. व आपल्या योग्य कामाची दखल घेऊन व वन विभागात आपल्याला हेलपाटे मारायला लागणार नाहीत. याबाबत श्रमिक मुक्ती दलाच्या व शेतकऱ्यांच्या अन्य प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा होऊन समाधानकारक उत्तरे मिळाली या चर्चेत प्रकाश मोरस्कर, संजय देसाई, निवृत्ती कांबळे, हरिबा कांबळे, श्री पोवार सह आजरा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.