आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त उर्दू विद्यामंदिर आजरा येथे योगासनांचे प्रात्यक्षिके।
आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील उर्दू – मराठी विद्यामंदिर आजरा येथे बुधवार दि. २१/०६/२०२३ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त उर्दू मराठी विद्यामंदिर आजरा येथे योगासनांचे प्रात्यक्षिके घेण्यात आले.
यावेळी प्रथम शाळेचे मुख्याध्यापक युनुस लाडजी यांनी आपले शरिर निरोगी राहण्यासाठी आपण कोणता व्यायाम केला पाहीजे यासह योगासनांचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. त्यानंतर समिउल्ला नाईकवाडी सर ,.वसीम पटेल सर व युनूस नाईक सर यांनी प्रत्यक्ष योगासनांचे प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांकडुन करुन घेतली.
यामध्ये प्राणायाम, नाडी शोधनासन ,भ्रामरी आसन भद्रासन इत्यादी आसन घेण्यात आली. विद्यार्थी उत्साहाने आसने करीत होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षिका सौ.कौसरबानो लाडजी ,श्रीमती. मासाहेबी मोमीन,श्री.मोहम्मद तगारे सौ.आसमा मुल्ला,श्रीमती. मिनाज नदाफ व अक्सा शिडवणकर यांचे सहकार्य लाभले.

