Homeकोंकण - ठाणेआजरा हायस्कूल आजरा.- सेवानिवृत्त शिक्षकांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

आजरा हायस्कूल आजरा.- सेवानिवृत्त शिक्षकांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

आजरा हायस्कूल आजरा.- सेवानिवृत्त शिक्षकांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील जनता एज्युकेशन सोसायटी आजरा संचलित आजरा हायस्कूल आजरा मध्ये २०२२-२३साला मध्ये सेवावृत्ती झालेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष जनता एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अशोकअण्णा चराटी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षक आम. भगवानराव साळुंखे होते. स्वागत प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील कुलकर्णी यांनी केले मान्यवरांच्या शुभहस्ते आजरा हायस्कूल आजरा च्या मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झालेले शिवाजी येसणे (मडिलगे ) पेरणोली हायस्कूल पेरणोलीचे सहाय्यक शिक्षक रमेश कांबळे (बुरुडे) मडिलगे हायस्कूल मडिलगेचे मुख्याध्यापक इनास डूमींग फर्नांडिस (पेरणोली)आजरा हायस्कूल आजरा चे सहाय्यक शिक्षक तुकाराम दत्तू वांईगडे (सांबरे) मडिलगे हायस्कूल चे शिपाई रमेश चव्हाण (खेडे)यांचा सहपत्नीक शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी आपल्या मनोगतातून सेवानिवृत्त शिक्षकांना शुभेच्छा दिल्या माजी मुख्याध्यापक शिवाजी येसणे यांच्या विषयी किरण कांबळे व सुमित्रा येसणे यांनी मनोगत व्यक्त केले सत्कार उत्तर देताना शिवाजी येसणे , इनास फर्नांडिस यांनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात मा चेअरमन अशोक अण्णा चराटी यांनी सेवानिवृत्त शिक्षकांकडून केलेल्या कामाचा आपल्या भाषणातून गौरव केला यावेळी संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ अनिल देशपांडे,सचिव रमेशअण्णा कुरुणकर, संचालक विजयकुमार पाटील, कृष्णा येसणे, सल्लागार आय के पाटील, दिलीप भालेराव,विजय बांदेकर,सुरेखा भालेराव, अर्जून भुईबंर, त्याचबरोबर आजरा महाविद्यालय चे प्रार्चाय सादळे सर,शिक्षक नेते जनार्दन निऊगरे विस्तार अधिकारी सुनित चंद्रमणी , विलास पाटील सर्व हायस्कूल चे मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी पाटील यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक बाळकृष्ण दरी यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.