HomeUncategorizedरत्नागिरी जिल्ह्यात होणार्‍या १३१ जागांवरील पोलिस भरतीसाठी ८ हजारांहून अधिक अर्ज

रत्नागिरी जिल्ह्यात होणार्‍या १३१ जागांवरील पोलिस भरतीसाठी ८ हजारांहून अधिक अर्ज

रत्नागिरी जिल्ह्यात होणार्‍या १३१ जागांवरील पोलिस भरतीसाठी ८ हजारांहून अधिक अर्ज

रत्नागिरी – प्रतिनिधी.

रत्नागिरी जिल्ह्यात होणार्‍या १३१ जागांवरील पोलिस भरतीसाठी आठ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत. राज्यात एकाच वेळी भरती होण्याची शक्यता आहे. रत्नागिरीसह अनेक भागात मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग भरतीची तयारी करताना दिसत आहे.

राज्यात गृह विभागाने तब्बल 18 हजार पोलिस कर्मचार्‍यांची पदे भरण्याची घोषणा केली आहे. जिल्ह्यात 131 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यात खुल्या वर्गासाठी 18 ते 28 वर्षे, मागासवर्गीय 18 ते 33 वर्षे वयाची अट आहे. राज्यात एकावेळी भरती होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कोकणात जिल्ह्यानिहाय ठाणे? ग्रामीण 68, रायगड 272, पालघर 211, सिंधुदुर्ग 99, रत्नागिरी 131 जागांचा समावेश आहे. पोलिस भरतीसाठी इच्छुक असणार्‍या अनेक तरुणांनी यात निवड व्हावी यासाठी कसून सराव सुरू केला आहे. कोरोनाच्या कालावधीत दोन वर्षे भरती न झाल्याने या वेळी वयाची मर्यादाही वाढवून देण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.