न्यायालयाने बंदी उठवलेल्या बेलेवाडीतील विकास कामे लवकरात लवकर चालू करावी ग्रामस्थांची निवेदनाने मागणी.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील बेलेवाडी ग्रामपंचायत चालू असलेली विकास कामे थांबू नयेत म्हणून मा. उच्च न्यायालयात लढा देऊन सदर विकास कामा वरील बंदी उठवली गावच्या विकास कामाबद्दल ज्या तळमळीने आपण उच्च न्यायालयात दरवाजा ठोठावला त्याच तळमळीने आपण बंदी उठवलेली विकास कामे लवकरात लवकर चालू करून बेलेवाडीच्या यात्रेपूर्वी पूर्ण करावीत याबाबतचे निवेदन ग्रामपंचायतला ग्रामस्थांनी दिले आहे.
तसेच सदर विकास कामे निकृष्ट दर्जाची होणार नाहीत याची काळजी आपण नेहमीप्रमाणे घ्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपण कामाचा दर्जाबाबत कोणतीही तडजोड करत नाही असा आपला नावलौकिक मागील पावणे दोन वर्षात झाला आहे. तरी न्यायालयाने बेलेवाडीतील ज्या विकास कामावरील बंदी उठवली आहे. ती कामे लवकरात लवकर सुरू करावी असे असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे.
या निवेदनावर जोतिबा नांदेडकर यांची सही आहे.
यावेळी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.