HomeUncategorizedभाग. १ ...

भाग. १ रणधुमाळी. ग्रामपंचायत. भादवण ग्रामपंचायतमध्ये होणार चुरशीची लढत. – शिवसेना. – विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, स्थानिक गट एकत्र. ( सरपंच पदाची चौरंगी लढतीची शक्यता. )

रणधुमाळी. ग्रामपंचायत भादवण.
भाग. १
भादवण ग्रामपंचायतमध्ये होणार चुरशीची लढत. – शिवसेना. – विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, स्थानिक गट, व भाजप. एकत्र ( सरपंच पदाची चौरंगी लढतीची शक्यता. )

आजरा. – प्रतिनिधी.. ०३

भादवण ग्रामपंचायतमध्ये होऊ घातलेली ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची लढत मानली जाते. शिवसेना. – विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, स्थानिक गट एकत्र आले येऊन शिवसेनेचे लोकनियुक्त सरपंच व शिवसेनेचे उप. ता. प्रमुख
शिवसेना – संजय पाटिल , तसेच पी. के केसरकर , रणजित गाडे , अशोक गुरव , दयानंद पाटील , अशोल गोईलकर अशी आघाडीतील प्रमुख नेतृत्व करणारी मंडळी आहेत. तर विरोधी आघाडीतील राष्ट्रवादी – संजय गाडे , बी टी जाधव,
कॉग्रेस- डॉ. गोपाळ केसरकर , राजू जोशीलकर , तुकाराम गुरव, महाडिक- संजय केसरकर व भाजप, हे गट एकत्रित येऊन शिवसेना या पॅनलची काट्याची टक्कर देणार आहेत.

मागील निवडणुकीत हे सर्व गट एकत्र असताना शिवसेनेचे संजय पाटील यांचा विजय झाला होता. मागील पाच वर्षांमध्ये गावाचा कायापालट करण्यासाठी त्यांची यशस्वी वाटचाल ठरली आहे. तर शिल्लक राहिलेली कामे देखील मार्गी लावणार असल्याचे यासाठी पाठपुरावा करत असल्याची समजते. अनेक वर्षापासून ताब्यात असलेली भादवण विकास सेवा संस्था देखील शिवसेना या गटाने विरोधकाकडून खेचून घेतली होती.

अशा अनेक राजकीय घडामोडी या गावात मागील पाच वर्षात घडल्या आहेत. तर विरोधी गटाकडून सरपंच संजय पाटील हे मनमानी कारभार करत असल्याचे देखील बोलले जात होते यामुळे विरोधी गावातील सर्व गट हे लोकनियुक्त सरपंच श्री पाटील यांच्या विरोधात राहिले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुका घोषित झाल्यानंतर श्री पाटील यांनी गावासमोर केलेल्या विकास कामाचा पाढा वाचत यावेळी गावाने आमच्या सोबत राहावं उर्वरित कामे मार्गी लावून गावचा कायापालट करू असे आश्वासन शिवसेना आघाडीने गावाला दिले होते. शिवसेना विरुद्ध गावातील सर्व गट असल्याने ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी राहणार नाही या गावांमध्ये एकूण मतदार २ हजार ९१४ आहेत. परंतु सरपंच पदासाठी महिला आरक्षण असल्यामुळे नेत्यांची मात्र गोची झाली आहे.

यामुळे प्रत्यक्ष लोकनियुक्त सरपंच संजय पाटील हे उमेदवार किंवा त्यांच्या कुटुंबातील उमेदवार नसल्यामुळे व ही उमेदवारी अन्य गावातील महिलेला दिली जाणार असल्याने सरपंच पदासाठी निवडणूक चुरशीची मानली जाते. परंतु गटातील दुसऱ्या व्यक्तीला सरपंच पदाची उमेदवारी दिली जाते हे देखील महत्त्वाचे समजले जाते.

परंतु गावातील सर्व गट एकत्र असल्यामुळे सरपंच श्री पाटील यांच्यावर नाराजीचा सूर विरोधी गटातून दिसत आहे. गावातील विरोधी गटातील नेते सरपंच श्री पाटील यांनी केलेल्या कामाबाबत यापूर्वी विश्वासात न घेतल्यामुळे होऊ घातलेल्या निवडणुकीत विरोधाला श्री पाटील यांना सामोरे जावे लागणार आहे.

गावातील सर्व गट पूर्वीपासून राजकारणात व समाजकारणात सक्षम असल्यामुळे शिवसेना या गटाची एकला चलो रे ही भूमिका कितपत साध्य ठरणार व नेमके उमेदवार कोण असणार हे माघारी नंतर स्पष्ट होणार आहे त्यामुळे गुलदस्तात असलेली ही निवडणुकीची उमेदवारांची रणनीती लवकर बाहेर पडून प्रचाराचा नारळ ठेवला जाईल.

एकंदरीत भादवण गावातील होऊ घातलेली ग्रामपंचायत निवडणुकीत जरी सर्व गट एकत्र असले तरी शिवसेना या गटासोबत त्यांची काट्याची टक्कर होणार आहे हे मात्र निश्चित.
{ या गावातून सरपंच पदासाठी सात अर्ज दाखल झाले आहेत. पैकी दोन्ही आघाडीचे दोन उमेदवार. – विरोधी गटातील एक उमेदवार अर्ज अर्ज व एका पक्ष अशी चौरंगी सरपंच पदाची निवडणूक होईल असे बोलले जाते. }

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.