HomeUncategorized⭕उंदराची हत्या केल्याप्रकरणी व्यक्तिवर गुन्हा दाखल,⭕जाणून घ्या नेमके काय घडले

⭕उंदराची हत्या केल्याप्रकरणी व्यक्तिवर गुन्हा दाखल,⭕जाणून घ्या नेमके काय घडले

उंदराची हत्या केल्याप्रकरणी व्यक्तिवर गुन्हा दाखल,
⭕जाणून घ्या नेमके काय घडले

(नवीदिल्ली वृत्तसंस्था),

उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात एका व्यक्तिवर चक्क उंदराची हत्या केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर या उंदराचे शवविच्छेदनही करण्यात आले.
नेमके हे प्रकरण इतके विकोपाला का गेले असावे, जाणून घेऊया.

बदायू जिल्ह्यात राहणाऱ्या मनोज कुमार या व्यक्तिने उंदराच्या शेपटीला दगड बांधून नाल्यात फेकून दिले.
त्यानंतर त्यांनी नाल्यात उडी मारून उंदाराला बाहेर काढले, मात्र तो जगू शकला नाही.
विकेंद्र शर्मा यांनी उंदराला नाल्यात फेकण्यापूर्वी त्यांना हे कृत्य करण्यापासून रोखण्याचा खूप प्रयत्न केला होता.
तरीही विक्रेंद यांचे म्हणणे न ऐकता मनोज यांनी उंदराला नाल्यात फेकून दिले होते.
या घटनेबाबत पिपल्स फॉर अॅनिमल या संस्थेचे कार्यकर्ते विकेंद्र शर्मा यांनी मनोज कुमार यांच्याविरोधात पोलीस स्थानकात लेखी तक्रार दाखल केली होती तसेच त्यांनी आपली तक्रार ट्विटरद्वावरही शेअर केली होती. त्यानंतर नाल्यातून मृतावस्थेत बाहेर काढलेल्या या उंदराचे पोस्टमार्टेम बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेत (I.V.R.I.) करण्यात आले. प्राणीप्रेमी विकेंद्र शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मनोज कुमार यांच्याविरुद्ध आय.पी.सी. कलम 429 आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम 11 (1) (एल) अंतर्गत एफ.आय.आर. नोंदवला आहे.

या घटनेबाबत मनोज कुमार यांनी सांगितले की,
माझी उंदरांना मारण्याची पद्धत अशीच असून मी अशाच पद्धतीने उंदरांना मारतो आणि यापुढेही मारत राहिन,
असे सांगून त्याने तुला जे करायचे ते कर अशी धमकी विकेंद्र कुमारला दिली.
याबाबत विकेंद्र शर्मा यांनी aajtak.in शी बोलताना सांगितले की,
लोकं या गोष्टीला विनोद म्हणून घेत आहेत,
पण इथे मुद्दा त्यांच्या ‘क्रूरपणा’चा आहे.
त्या उंदराला किती निर्दयीपणे मारले,
हे पाहणे गरजेचे आहे.

विकेंद्र शर्मा यांच्या तक्रारीवरून बदायूं पोलिसांनी आरोपी मनोज कुमारला पोलीस ठाण्यात बोलावले.
मनोजची अनेक तास चौकशीही करण्यात आली.
त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला असून,
मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत कोणतीही माहिती उघडकीस आली नसून कोतवाली पोलीस ठाण्यात उंदराच्या टाकून देण्यात आलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन बरेली येथे करण्यात आले असून याविषयी अहवाल येणे अद्याप बाकी असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. विकेंद्र शर्मा यांनी सांगितले की, मनोज कुमारला अटक करण्यात आली होती,
पण नंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

आयपीसीच्या कलम 429 अंतर्गत कोणत्याही प्राण्याला मारणे किंवा अपंग करणे हा गुन्हा आहे.
या कलमाअंतर्गत जे एखाद्या प्राण्याला मारले गेले किंवा विष दिले गेले,
तर दोषीला ५ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
घटनेच्या अनुच्छेद 51 (ए) (जी) मध्ये म्हटले आहे की,
प्रत्येक सजिव प्राण्याविषयी सहानुभूती बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत कर्तव्य आहे. म्हणजेच पर्यावरण आणि निसर्गाचा समतोल राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.