उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदरावांची धावपळ.- कणकवलीत बुधवारी सरपंच पदासाठी २१ तर सदस्य पदासाठी १०७ उमेदवारी अर्ज दाखल
कणकवली/प्रतिनीधी.
तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतींसाठी आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्ज मध्ये सरपंच पदासाठी २१ तर सदस्य पदासाठी १०७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे तालुक्यात आत्तापर्यंत सरपंच पदासाठी ३१ आणि सदस्य पदासाठी १२९ उमेदवारी अर्ज भरणा करण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २ डिसेंबर आहे. दरम्यान, ऑनलाईन उमेदवारी अर्ज भरताना करताना अनेक अडचणी येत असल्याने नाराजीचा सूर आहे. याबाबत, तालुक्यातील काही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार रमेश पवार यांना निवेदनही दिले आहे. याबाबत तातडीने निवडणूक आयोगाला नागरिकांच्या समस्या आम्ही कळवू अशी श्री. पवार यांनी निवडणूक प्रतिनिधींना सांगितले आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज तिसरा दिवस होता. यामध्ये कणकवली तालुक्यातील ५८ ग्रामपंचायती मध्ये आज असलदे ग्रामपंतायतीसाठी ३ सरपंच आणि ९ सदस्य, बिडवाडी १ सरपंच, फोंडाघाट १ सरपंच १ सदस्य, हरकुळ बुद्रुक २ सरपंच २० सदस्य, कलमठ ५ सदस्य, कसवण- तळवडे १ सरपंच आणि सदस्य पदासाठी ८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खारेपाटणसाठी १ सरपंच तर ७ सदस्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. कोळोशी ग्रामपंचायतीसाठी प्रत्येकी एक सरपंच आणि सदस्य,कोंडये एक सरपंच २ सदस्य, कुंभवडे १ सदस्य, नागवे १ सदस्य, नांदगाव १ सरपंच आणि ७ सदस्य पदासाठी अर्ज दाखल झाले आहेत. नरडवे सरपंच पदासाठी १ अर्ज आला आहे. नाटळ सरपंच २ आणि ९ सदस्य, पियाळी २ सरपंच १ सदस्य, सांगवे २ सदस्य, सावडाव १ सरपंच २ सदस्य, शिरवल १ सदस्य, शिवडाव १० सदस्य, तळेरे २ सदस्य, तरंदळे १ सदस्य आणि वागदे ग्रामपंचायतसाठी १ सरपंच आणि ९ सदस्य, वाघेरी २ सरपंच ६ सदस्य, वारगाव १ सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.