HomeUncategorizedमोठी बातमी ! शिवसेना कोणाची ? ‘या’ तारखेला निवडणूक आयोगासमोर होणार सुनावणी

मोठी बातमी ! शिवसेना कोणाची ? ‘या’ तारखेला निवडणूक आयोगासमोर होणार सुनावणी

मोठी बातमी ! शिवसेना कोणाची ? ‘या’ तारखेला निवडणूक आयोगासमोर होणार सुनावणी

नवी दिल्ली : – वृत्तसंस्था.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेनेत उभी फूट पडल्याने उद्धव ठाकरेंना न्यायालयाचे दार ठोठवावे लागले. त्यासोबतच पक्षाच्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला देखील सामोरे जावे लागले. आता निवडणूक आयोगासमोर ठाकरे गटाची सुनावणी होणार आहे. त्यासाठी आयोगाने पुढील तारीख दिल्याचे देखील समोर आले आहे.

निवडणूक आयोगाने शिंदे आणि ठाकरे या दोन्हही गटांना आपले सर्व पुरावे कागदपत्रांसह जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता दोन्हही गटाच्या वकिलांना १२ डिसेंबर रोजी आयोगासमोर युक्तिवाद करण्याची तारीख देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता १२ डिसेंबरला शिवसेनेवर नेमका कोणाचा हक्क हे स्पष्ट होणार का ? याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

तत्पूर्वी एकनाथ शिंदे यांनी आम्हीच खरी शिवसेना असल्याचे म्हटल्यामुळे अंधेरीत झालेल्या पोट निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. त्यानंतर शिंदे गटाचा बाळासाहेबांची शिवसेना तर ठाकरे गटाला शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आलं होत. त्यासोबतच शिंदे गटाला ढाल तलवार तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं होत. पुढील प्रक्रिया किचकट आणि दिर्घकाळ चालणारी असली तरी या तारखेला काय घडत यावर दोन्हही गटांची आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पावले पडणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.