HomeUncategorizedमुंबईला जाण्यापेक्षा बांबुपासून छोटे - छोटे उद्योग निर्मीतीचे घेऊन

मुंबईला जाण्यापेक्षा बांबुपासून छोटे – छोटे उद्योग निर्मीतीचे घेऊन

मुंबईला जाण्यापेक्षा बांबुपासून छोटे – छोटे उद्योग निर्मीतीचे घेऊन जगुया- सतीश कांबळे.

आजरा. – प्रतिनिधी.

मुक्ती संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन आज क्रांतीबा जोतीराव फुले स्मृतिदिना निमित्त यांच्यावतीने अश्वघोष बांबु रोपवाटिका संस्थेमध्ये क्रांतिबा जोतीराव फुले स्मृतिदिन व बांबु उद्योग कार्यशाळा आयोजित केली होती . या कार्यशाळेची सुरुवात क्रॉलीबा जोतीराव फुले यांना अभिवादन करून व त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार लक्ष्मी कांबळे ( राज्य सदस्या घरकामगार युनियन ) ग्रा.प. पेरणोली माजी उपसरपंच अर्जुन कांबळे , संग्राम सावंत (राज्याध्यक्ष मुक्ती संघर्ष समिती ) दिंगबर विटेकरी ( सामाजिक कार्यकर्ते ) ; सतीश कांबळे ( अध्यक्ष – अश्वघोष बबु रोपवाटिकासंथा ) यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना सतिश कांबळे म्हणाले , मुंबईला जाण्यापेक्षा बाबुपासून छोटे – छोटे उद्योग निमिर्तीचे ध्येय घेऊन जगुया . उसापेक्षा जास्त कायदा देणारे पीक बांबुपीक आहे. उसापेक्षा कमी श्रमात व दीर्घकाळ काळ फायदा देणारा बांबु उद्योग आहे. तसेच पर्यावरण समृद्ध उद्योग आहे.

यासाठी आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने देण्यासाठी आम्ही तयार आहोत. तसेच ते पुढे म्हणाले , बांबु लागवडीचे महत्त्व सांगताना. बांबुपासून हस्त कलेच्या वस्तू , फर्निचर , प्लायबोर्ड , कागद , कापड , बायोसीएनजी , इथेनॉल ‘ अशी अनेक उत्पादने घेतली जाऊ शकतात. वीजनिर्मितीसाठी सुद्धा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो . यासाठी अनेक शासकीय योजना सुद्धा आहेत.या योजनांचा लाभ घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यांना बांबू लागवड करता येऊ शकते. रोजगार हमी योजनेतून एकरी १,१२,००० / – इतके अनुदान मिळले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करताना संग्राम सावंत यांनी सांगितले की , शाश्वत विकास होण्यासाठी आणि पर्यावरण समृद्ध उद्योग म्हणून बांबु उद्योगाकडे वळले पाहिजे. हेच खरे क्रांतीबा जोतीराव फुले यांना अभिवादन आहे.

मुक्ती संघर्ष समितीच्या वतीने अनेक भागात आम्ही ‘ शाश्वत विकासासाठी बांबु उद्योग ‘ अशा कार्यशाळा घेणार आहोत. यावेळी जयश्री कांबळे , लक्ष्मी कांबळे , पूजा कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाची प्रास्ताविका मजीद मुल्ला यांनी केली . आभार रेश्मा कांबळे यांनी व्यक्त केले. यावेळी मजीद मुल्ला, दिंगबर विटेकरी, संजय कांबळे, माजी उपसरपंच अर्जुन कांबळे , शफीक तकीलदार , बाळु कांबळे , राहुल दास , विनायक कांबळे , शंकुतला बोरनाक , रेश्मा कांबळे सह संघटनेच्या महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.