HomeUncategorizedसरपंच, सदस्य पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी इतकी शैक्षणिक अर्हता लागणार, महाराष्ट्र राज्य ग्रामविकास...

सरपंच, सदस्य पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी इतकी शैक्षणिक अर्हता लागणार, महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय..!. – काय आहे. नियमावली पहा. 👇 थंडीच्या कडाक्यात गावागावातील राजकीय वातावरण तापले. – भाग. ५

सरपंच, सदस्य पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी इतकी शैक्षणिक अर्हता लागणार, महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय..!. – काय आहे. नियमावली पहा. 👇 थंडीच्या कडाक्यात गावागावातील राजकीय वातावरण तापले. – भाग. ५

मुंबई. – प्रतिनिधी.

ग्रामपंचायत सदस्य सह सरपंच पदाची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार हा किमान सातवी पास असावा,असा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. गावचा प्रपंचा चालवण्यासाठी शैक्षणिक अर्हतेची मर्यादा ग्रामविकास विभागाकडून घालण्यात आली आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने सरपंच अथवा सदस्यांचा शैक्षणिक अर्हतेबाबत आदेश जारी केला आहे. त्यानुसार, 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेली व्यक्तीस सरपंच अथवा सदस्य पदासाठीची निवडणूक लढवण्यासाठी किमान सातवी पास असणे आवश्यक आहे.

हे प्रमाणपत्र द्याव लागणार.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना, सातवी पास असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र इच्छूक उमेदवारांला सादर करावे लागणार आहे. अर्थातच,ज्यांचा जन्म 1995 पूर्वी झालेला असेल, त्या उमेदवाराला मात्र ही शैक्षणिक अट लागू नसेल अस ग्रामविकास विभागाच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे.

त्याचबरोबर, राज्यात सध्या सुमारे 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल सुरु असून, सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या 28नोव्हेंबर पासुन रणधुमाळी सुरु होणार आहे. त्यामुळे ऐन थंडीच्या कडाक्यात गावागावातील राजकीय वातावरण तापले आहे. सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने चुरस आणखी वाढत चालली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.