ग्रामपंचायत रणधुमाळी.- तिरंगी ग्रामपंचायत चौरंगी सरपंच – लढतीकडे वाटचाल. – मडिलगे ग्रामपंचायत निवडणूक. – भाग ४
आजरा. – प्रतिनिधी.२७

मडिलगे ता. आजरा येथील होऊ घातलेली ग्रामपंचायत निवडणूक तिरंगी ग्रामपंचायत चौरंगी सरपंच लढतीकडे वाटचाल शक्यता नाकारता येत नाही. मडिलगे सह तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक अर्ज भरण्याची तारीख जवळ आली आहे. दि. २८ पासून अर्ज भरण्यासाठी सुरवात होणार आहे. तीनही आघाड्या एकास एक उमेदवार देण्यासाठी खाजगी बैठकीत सुरू आहेत. पण दोन गट एकत्र येऊन दुरंगी लढतीची शक्यता व चर्चा असली तरीही अद्याप दुरंगी लढतीची मनस्थिती कोणत्याही गटात दिसत नाही. “एकला चलो रे” अशीच तीनही समूहातील कार्यकर्ते यांचे मत असल्याचे चर्चेत आहे.
यामध्ये बाजी कोण मारेल व कोणते गट एकत्र येतील हे माघार पूर्वीच स्पष्ट होणार आहे. तरीही माजी ग्रामविकास मंत्री आम. हसन मुश्रीफ यांची समझोता एक्सप्रेस उत्तुर जिल्हा परिषद मध्ये येऊन धडकली तरच या उत्तुर जि. प. मधील काही ग्रामपंचायत निवडणुका राष्ट्रवादीमध्ये दोन गटात होणाऱ्या लढती थांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. व असे झाल्यास येणाऱ्या जि. प. व प. स निवडणुकीत राष्ट्रवादीला चांगले यश संपादित होईल याची शक्यता नाकारता येणार नाही परंतु काही गावात राष्ट्रवादीमध्ये दोन गटात ग्रामपंचायत करायला सुरुवात झाली तर याचा तोटा येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळेल. अशी ही चर्चा ग्रामस्थांमध्ये केली जाते.
परंतु या गावात कोणत्याही पक्षाच्या नावावर लढत होत नसून गावातील गटाच्या माध्यमातून लढत होत आहे. यामुळे यानंतर देखील ग्रामपंचायत लढत विरोधात जरी असली तरी येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत हे परस्पर विरोधी लढणारे गट एकत्र येऊन देखील पक्षाच्या उमेदवाराला मदत करू शकतात. कारण मुळात ग्रामपंचायत निवडणूक ही स्थानिक गटातटाच्या राजकारणात प्रत्यक्षात निवडणुकीला सामोरे जात असतात.
जवळजवळ तीनही आघाडीच्या तिन्ही प्रभागातील उमेदवार निश्चित झाले असून परस्पर लढती या निश्चित आहेत. कोणाचीही समझोता एक्सप्रेस एकमेकांसोबत जुळत नसल्याने सरपंच पद कोणत्या गटाकडे यामुळे एकला चलो रे हीच भूमिका प्रत्येक समूहाने घेतली आहे यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जाणार आहे.
अद्याप गुलदस्त्यात असलेल्या या तीनही आघाड्या माघारी पूर्वी यातील दोन गटातील कार्यकर्त्यांची मने जुळवण्यास नेतेमंडळींना यश आल्यास दोन गट एकत्र येऊ शकतात असेही बोलले जात आहे. यातील काही नेतेमंडळांची जरी इच्छा असल्यास कार्यकर्त्यांची एकत्र येऊन लढण्यास इच्छा नसल्यामुळे तिन्ही आघाड्या परस्पर लढण्यास शड्डू ठोकत आहेत. परंतु येणाऱ्या माघारीपर्यंत निश्चितपणे चित्र स्पष्ट होईल.