चंदगड – किटवाड धबधब्यात बुडून ४ मुलींचा दुर्दैवी मृत्यू.
चंदगड. – प्रतिनिधी.
चंदगड : बेळगावमधील ४ मुलींचा चंदगड तालुक्यातील किटवाड येथील धबधब्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहें.
सदरच्या मिळालेल्या माहितीनुसार, या मुली फिरण्यासाठी बेळगावच्या सीमेवर असणाऱ्या चंदगड तालुक्यातील किटवाड धबधब्यावर आलेल्या होत्या. दरम्यान,यांतील काही मुली धबधब्याच्या काठावर सेल्फी फोटो काढत असताना फूटपाथवरून घसरल्याने त्यातील चार तरुणींचा धबधब्याखाली पडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली.एकूण पाच मुली या धरणाच्या पाण्यात बुडाल्या.त्यापैकी एकाला वाचवण्यत यश आलं आहे. तर चार महिलांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी एका मुलीची प्रकृती ही गंभीर होती.तिला के.एल.ई हाँस्पिटल बेळगाव येथे नेण्यात आले.किटवाड धरण हे पर्यटकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. त्यामुळे येथील येणाऱ्या पर्यटकांनीं आता खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.
किटवाड धबधब्यावर आलेल्या सर्व जण मुली बेळगाव महाविद्यालयात शिकत आहेत.उज्वल नगर आशिया मुजावर (१७), अनागोला कुडशीया हसम पटेल (२०) रा. झटपट कॉलनीतील रुक्शार भिस्ती (२०) आणि तस्मिया (२०) यांचा मृत्यू झाला.