HomeUncategorizedकट्टरतावाद्यांनी केली दलित तरुणाची हत्या; कथित आंबेडकरवादी गप्प का?

कट्टरतावाद्यांनी केली दलित तरुणाची हत्या; कथित आंबेडकरवादी गप्प का?

कट्टरतावाद्यांनी केली दलित तरुणाची हत्या; कथित आंबेडकरवादी गप्प का?

नांदेड : – प्रतिनिधी.

श्रद्धा वालकर या दलित तरुणीची आफताब अमीन पूनावालाने केलेल्या हत्येचे प्रकरण ताजे असताना राज्यातील आणखी एका दलित तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. नांदेड येथील देगावचाळ परिसरात राहणाऱ्या स्वप्नील नागेश्वरचे एका तरुणीशी प्रेम संबंध होते. त्यातून शायजाद खान एजाज खान, महम्मद सद्दाम महम्मद कुरेशी, महम्मद उसामा महम्मद साजिद कुरेशी, शेख आयान शैख इमाम, सोहेल खान साहेब खान, सय्यद फरहान, उबेद खान युनूस खान या आरोपींनी स्वप्नीलची बेदम मारहाण करून हत्या केली.

स्वप्निल शेषराव नागेश्वर (३०) या ऑटोचालकाची दि. २१ नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजता हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणातील ७ आरोपींच्या अवघ्या ४८ तासांत मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितीनुसार स्वप्नील संबंधित मुलीसह फिरायला गेला असताना सायजाद खान व त्याच्या गुंड मित्रांनी त्या दोघांना गाठले पुढे “तू पोरीला हॉटेलवर घेऊन जातो का?’ असे म्हणत स्वप्निल व त्याच्यासोबतच्या महिलेस बळजबरी ऑटोत कोंबले आणि नदीकाठी उर्वशी मंदिराजवळ असलेल्या दर्ग्यासमोर नेल्यावर त्याची लाठ्या काठ्यांनी हत्या करण्यात केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.