शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाची २७ रोजी सहविचार सभा
कणकवली/प्रतिनिधी.
शैक्षणिक प्रयोगशाळा कर्मचारी महासंघ शाखा सिंधुदुर्ग जिल्हाची सहविचार सभा रविवार दि. २७ रोजी पणदूर हायस्कूल ता.कुडाळ येथे ९ वा. मा.जिल्हाध्यक्ष रामचंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली व मा.राज्याध्यक्ष श्री.भरतजी जगताप सर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. मागिल दोन वर्षात कोरोनासारख्या महामारीमुळे सर्व संपर्क ठप्प झाले होते तरी राज्यस्तरावर कार्यवाही सुरू होती. या बैठकीचे औचित्य साधून जिल्ह्यातील सन्-2018पासून सेवानिवृत्त झालेले,विशेष कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार व 10वी-12वी पास पाल्यांचा सत्कार करण्याचे ठरविले आहे. तसेच या बैठकीत राज्याध्यक्ष मा.जगताप सरांचे सखोल मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यक्रमानिमित्त स्नहभोजन आयोजन जिल्हा कार्यकारणीने केले आहे.
तरी सर्व प्रयोगशाळा कर्मचाऱ्यांनी वेळीच उपस्थित राहावून महासंघास सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हाध्यक्ष मा. काळे सरांनी केले आहे.