HomeUncategorizedआजऱ्यातील गंगामाई वाचन मंदिरच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा.- १५ ऑक्टोंबर वाचन प्रेरणा...

आजऱ्यातील गंगामाई वाचन मंदिरच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा.- १५ ऑक्टोंबर वाचन प्रेरणा दिनादिवशी होणार वितरण

आजऱ्यातील गंगामाई वाचन मंदिरच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा.- १५ ऑक्टोंबर वाचन प्रेरणा दिनादिवशी होणार वितरण.

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरच्या विविध राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. साहित्य पुरस्कारांचे वितरण शनिवार दि.१५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनादिवशी आयोजित करण्यात आले आहे. मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार नंदू साळोखे यांच्या इपळाप कादंबरीला तर भूमिपुत्र साहित्यिक पुरस्कार प्रा. श्रीकांत नाईक यांना जाहीर झाला आहे अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष डॉ.अशोक बाचूळकर यांनी दिली.
मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार नंदू साळोखे ( बेलेवाडी ) यांच्या इपळाप कादंबरीला, कै.दाजी टोपले नाट्यलेखन पुरस्कार डॉ. अनंता सूर ( चंद्रपूर ) यांच्या प्रतिशोधला नाटकाला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर लक्षणीय गद्य साहित्य पुरस्कार डॉ. राजेंद्र राऊत ( अमरावती ) यांच्या लीळाचरित्रातील कथनरूपे ललित गद्यकृतीला, बाल कवितासंग्रह पुरस्कार विलास मोरे ( जळगाव ) यांच्या तिसरा डोळा बालसाहित्याला, मैत्र काव्य पुरस्कार संजय चौधरी ( नाशिक ) यांच्या आतल्या विस्तवाच्या कविता या काव्यसंग्रहाला, तर भूमिपुत्र साहित्यिक पुरस्कार प्रा. श्रीकांत नाईक ( गडहिंग्लज) यांना जाहीर झाला आहे. माता गौरव पुरस्कार श्रीमती सुनंदा कातकर ( खेडे, ता. आजरा ), कै. काशिनाथअण्णा चराटी उत्कृष्ट ग्रंथालय अ वर्ग पुरस्कार – सार्वजनिक वाचनालय मलकापूर ता. शाहूवाडी, कै. माधवरावजी देशपांडे उत्कृष्ट ग्रंथालय ब वर्ग पुरस्कार – स्वराज्य ग्रामीण वाचनालय वेंगरूळ ता.भुदरगड, कै. बळीरामजी देसाई उत्कृष्ट ग्रंथालय क वर्ग पुरस्कार – भाऊसो कुराडे सार्वजनिक वाचनालय सरोळी ता. आजरा तर उत्कृष्ट वाचक म्हणून बालवाचक कु. आयर्न कांबळे, अभ्यासिका पंकज कांबळे, महिला वाचक श्रीमती साधना डोणकर, पुरुष वाचक वसंत जोशी यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण मृत्युंजयकार शिवाजी सावंत सभागृहात शनिवार दि.१५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ५ वा. साहित्यिक व जेष्ठ पत्रकार विजयकुमार दळवी यांच्या हस्ते होणार आहे. वाचन प्रेरणा दिनानिमित्त भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या पुस्तकांचे प्रदर्शनही आयोजित केले आहे अशी माहिती अध्यक्ष डॉ. अशोक बाचूळकर यांनी दिली. यावेळी उपाध्यक्षा गीता पोतदार, कार्यवाह सदाशिव मोरे, विजय राजोपाध्ये उपस्थित होते
.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.