कोल्हापूर जिल्हा मद्यवर्ती बँकेमार्फत सभासदांचा दोन लाखांचा अपघाती विमाचे चेकचे वितरण.
आजरा/प्रतिनिधी.
कोल्हापूर जिल्हा मद्यवर्ती बँकेमार्फत सभासदांचा दोन लाखांचा अपघाती विमाचे चेकचे वितरण झुलपेवाडी ( ता.आजरा ) येथील बलभिम विकास सोसायटीचे सभासद विश्वास दत्तू पावले यांचे अपघाती निधन झाले होते. कोल्हापूर जिल्हा मद्यवर्ती बँकेमार्फत सर्व सभासदांचा दोन लाखांचा अपघाती विमा उतरला होता. या विम्यापोटीचा चेक पावलेंच्या वारसांना बँकेचे संचालक सुधीर देसाई यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी विभागीय अधिकारी सुनील दिवटे, निरिक्षक बबन पाटील, चेअरमन संभाजी जाधव,संचालक अशोक सुतार , रणधिर माने,मारुती देवर्डे, गणेश एकल, शिवाजी पोटे, सचिव रवि पाटील,प्रताप अस्वले, विष्णू पावले, विष्णू जाधव, ज्योतिराम बेलवाडकर,आनंदा ठाणेकर, श्रीपती तोडकर आदी उपस्थित झाले. रवि पाटील यांनी आभार मानले.