आजऱ्यातील विकास संस्थांचे कार्य आदर्शवत- माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील विकास संस्थांचे कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे अद्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी काढले. उत्तूर (ता. आजरा ) येथे आजरा तालुक्यात सभासद पातळीवर शंभर टक्के वसुली केलेल्या संस्थांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अद्यक्षस्थानी बँकेचे संचालक सुधीर देसाई होते. प्रारंभी
प्रास्ताविकात बँकेचे विभागीय अधिकारी सुनील दिवटे यांनी बँक आणि विकास संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेतला.
सुधीर देसाई म्हणाले ,’ आजरा तालुक्याने बँक पातळीवर ९१.७१ % इतकी विक्रमी वसुली करुन जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे . पंधरा संस्थांनी सभासद पातळीवर शंभर टक्के वसुली केली असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी बँकेमार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.
मुश्रिफ म्हणाले ,’आजरा तालुक्यातील शेतकरी हा प्रामाणिक असून शेतीच्या विकासासाठी पीक कर्जाबरोबरच मद्यम मुदतीच्या कर्जाचीही मागणी शेतकऱ्यांनी करावी.
यावेळी शृंगारवाडी,वडकशिवाले, आवंडी,सरंबळवाडी, करपेवाडी, सावरवाडी,चाफवडे, वाटंगी,मोरेवाडी,एमेकोंड,मोरेवाडी,हंदेवाडी,खोराटवाडी, देवर्डे,बुरुडे या विकास संस्थांचा सत्कार करण्यात आला. सचिव संघटनेच्यावतीने मुश्रिफ यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला वसंतराव धुरे, शिरीष देसाई ,दिपक देसाई ,मारुतीराव घोरपडे,महादेव पाटील, संभाजी तांबेकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी,बँकेचे अधिकारी व सचिव उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार बबन पाटील यांनी मानले.