श्री संत गाडगेबाबा शाळेत शालेय उपयोगी साहित्य-वस्तूंचे वाटप.
मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील भिवाळी गावातील श्री संत गाडगेबाबा आदिवासी आश्रम शाळेत परेल, लोअर परेल सामाजिक विकास संस्था प्रकाश पाटकर (संस्थापक) यांच्या संकल्पलनेतून वर्षानुवर्षची परंपरा कायम राखत सोबत रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पेनिनसुला हा क्लब व पाटकर यांच्या आवाहानातून संस्थेच्यावतीने शालेय उपयोगी, क्रीडा साहित्य , औषधे , वाचनालयात पुस्तके ठेवण्यासाठी दोन कपाटे शाळेतील सहाशे विद्यार्थ्यांना सर्व वस्तू वाटप करून शालेय मुलांच्या शिक्षणासाठी मदतीचा हातभार लावला.सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाला सुरवात होऊन लेझिम नृत्य करत शालेय विद्यार्थिनींनी पाहुण्यांचे स्वागत केले.कार्यक्रम स्थळी मा.विजयानंद राजे (वास्तू विशारद) यांनी अध्यक्ष पद स्वीकारले.त्यांच्या ८१ व्या वाढदिवसाला सर्वांनी शुभेच्छा दिल्या व त्यांना आरोग्यमय दीर्घ आयुष्य लाभो हे मागने गाडगेबाबा चरणी अनेकांनी मनोगतातून व्यक्त केले.एम. यल डहाणूकर कॉलेज व पोदार कॉलेजचे विद्यार्थी व समाजसेविका छाया गचके , पाटकर कुटुंबीय व मित्र परिवाराच्या मदतीने वह्या, पेन, दप्तर, चादर , कंपासमधील साहित्य, पॅड ,चटई, साबण, रेबिन असे सर्व मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात मोलाचे सहकार्य केले.
सरकारी अॅ. दीनानाथ वालावलकर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थांना मोलाचे मार्गदर्शन केले मा. आण्णासाहेब आहेर (पत्रकार) यांनी गाडगेबाबा यांनी हाती घेतलेले स्वच्छ्ता, शिक्षण ह्या बाबींना प्राधान्य दिल्याप्रमाणे शाळेतील शिक्षक वर्ग तेथील मदतनीस अतिशय सुंदर नियोजनात मुलांना स्वच्छ्तेचे महत्व शिक्षणातून घडवत असून निसर्गरम्य वातावरण, कुटुंबीय पासून दूर असणाऱ्या मुलांचे छान आरोग्य पाहून आहेर यांनी सर्व शाळेतील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत ह्या शाळेतून गरीब कुटुंबातील मुले- मुली गुणवंत घडत राहावेत त्यांना चांगले शिक्षण मिळत रहावे ही आपेक्षा व्यक्त केली. व श्री. पाटकर यांच्या हातून असेच अनमोल कार्य घडत राहण्याबाबत महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ च्या वतीने शुभेच्छा देत त्यांच्या विविध क्षेत्रातील मदतीच्या कार्याला सलाम केला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रकाश पाटकर यांनी शाळेच्या इतर समस्या जाणून घेत जुन्या हॉलचे सुशोभीकरण व लादी बसवणे तसेच मुलांना चप्पल स्टँड इतर काही कामे या महिन्यात करून देण्याचे आश्वासन देत येणाऱ्या पंधरा ऑगस्ट ला सर्व मुलांना गणवेश देण्याचे जाहीर केले शाळेचे संचालक आवटे यांनी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त करत ह्या शाळेतून आनेक मुले आज उच्च पदावर आहेत मुलांना चांगले शिक्षण आम्ही देत राहू व आता शिक्षण घेत विद्यार्थी ही नक्कीच पुढे चांगले नाव कमावतील अशी आशा व्यक्त केली.