HomeUncategorizedशेती पर्यटन व रोजगाराच्या दृष्टीने कृषी मंत्री दादाजी भुसे .- यांना आजरा...

शेती पर्यटन व रोजगाराच्या दृष्टीने कृषी मंत्री दादाजी भुसे .- यांना आजरा शिवसेनेचे विविध मागणीचे निवेदन.

शेती पर्यटन व रोजगाराच्या दृष्टीने कृषी मंत्री दादाजी भुसे .- यांना आजरा शिवसेनेचे विविध मागणीचे निवेदन.

आजरा. – प्रतिनिधी.

शेती पर्यटन व रोजगाराच्या दृष्टीने कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य दादाजी भुसे यांना आजरा शिवसेनेचे विविध मागणीचे निवेदन दिले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आजरा तालुक्यात हत्ती या वन्यप्राण्या पासून शेती अवजारांची होणाऱ्या नुकसानाला पोटी योग्य ती तरतूद करून तातडीने नुकसान भरपाई मिळावी, वन्य प्राण्यांचा वावर असणाऱ्या तालुक्यातील पश्चिम भाग व काहीसा पूर्व भागामध्ये शेतीपंपासाठी दिवसा किमान आठ तास वीज मिळावी, भाताचे देशी वाण अशी ओळख असणाऱ्या आजरा घनसाळ, काळा जिरगा त्यांचे संरक्षण व संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम राबवण्यात यावा, आजरा तालुक्यातील १९५२ साली पहिले कृषी प्रदर्शन झाले होते शेती हे तालुका व त्यांचे प्रमुख रोजगाराचे साधन आहे. शेतीमध्ये नवीन प्रयोग राबवून उत्पादकता वाढविण्यासाठी तालुक्यातील कृषी विभागामार्फत राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात यावे, आजरा येथे असणाऱ्या वनौषधी पार्कच्या विकासासाठी स्वतंत्र निधी मिळावा, मधाचा गाव या योजनेमध्ये आजरा तालुक्यातील आंवडी,किटवडे, चितळे, मोरेवाडी, हरपवडे या धनरगरवाड्यांचा समावेश करण्यात यावा. आजरा तालुक्‍याच्या विकासाच्या दृष्टीने वरील मागण्या मार्गी लावण्यास आपण योग्य ते सहकार्य करावे. अशा आशयाचे देण्यात आले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, चंदगड संपर्क प्रमुख सुनील शिंत्रे, शिवसेना ता. प्रमुख युवराज पोवार, राजेंद्र सावंत सह पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.