रमेश सरतापे यांची मुंबई टायटन्स टीमच्या कर्णधार पदी निवड
मुंबई (शांताराम गुडेकर)
दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया आणि द्वारका सिटी न्यूजपेपर आयोजित इंडियन व्हीलचेअर प्रीमियर लीगचे तिसऱ्या सत्राचे आयोजन दिल्ली मध्ये २१ ते २५ जुन मध्ये होणार आहे. ह्या स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार आहे तसेच पूर्ण भारतातून १२० आणि नेपाल मधून ८ व्हीलचेअर क्रिकेट खेळाडू सहभागी होणार आहे.रमेश सरतापे हे भारतीय आणि महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट संघाचे कर्णधार आहे.इंडियन व्हीलचेअर प्रीमियर मध्ये मुंबई टायटन्सचे कर्णधार बनवल्यामुळे अनेकांनी त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे. याआधी त्यांनी कर्णधार पदावर असताना महाराष्ट्र टायटन्स संघ इंडियन व्हीलचेअर प्रीमियरच्या पहिल्या सत्रात विजेता आणि दुसऱ्या सत्रात उपविजेता बनला होता.दिव्यांग व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन सर्व पदाधिकारी आणि पय्याडे स्पोर्ट्स क्लबचे डॉ. पी.व्ही.शेट्टी, लायन्स क्लबचे नटवर बनका, तलकचंद शाह, समाजसेवक केतन चौकशी आणि आशिष मार्केटिंगचे आशिष भोथरा यांनी शुभेच्छा दिल्या.