मराठी भाषा दिन जरूर साजरा करुया…व केलाच पाहिजे. पण…
( मराठी ज्ञानभाषा होईल तो दिवस आपण कधी साजरा करणार?
२७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा दिन’विशेष.)
सह्याद्री. अग्रलेख.
मराठी काव्यातील महान कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाला ‘मराठी भाषा दिन’ म्हणून गौरविले गेले. कारण कुसुमाग्रज यांनी १९४२ च्या ऑगस्ट क्रांतीमधील धगधगत्या इतिहासाला ‘क्रांतीचा जयजयकार’ या महान कवितेने देशपातळीवर नेले. त्या दिवसाची हकीकत अंगावर काटा आणते. कुसुमग्रज तेव्हा वि. वा. शिरवाडकर होते. पुण्याच्या ‘प्रभात’ दैनिकात ते उपसंपादक होते. वालचंद कोठारी हे संपादक होते. हे बिगरमराठी संपादक कट्टर संयुक्त महाराष्ट्रवादी होते. मराठीचे प्रेमी होते. कुसुमाग्रज यांची ‘गर्जा जयजयकार’ ही कविता ७ अॅागस्ट १९४२ रोजी प्रभात दैिनकात छापून आली. पुण्याच्या पोिलसांनी (आताच्या भाषेत ई.डी.) प्रभात दैनिकावर छापा टाकला. चौकशी सुरू केली. ‘कोण कुसुमाग्रज?’…. संपादकीय विभागातील सगळे सदस्य एकमेकांना विचारू लागले… ‘अरे, कोण कुसुमाग्रज?…’ पोलिसांनी संपादकीय विभागचे रजिस्टर तपासले…. कर्मचाऱ्यांची नावे तपासली. तर त्यात कुसुमाग्रज हे नाव कुठेच नव्हते. वि. वा. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज हे पोलिसांना मािहती नव्हते… पोलीस निघून गेले. कविता गाजली. आजही ‘ए मेरे वतन के लोगो…’ सारखे ते क्रांती गीत आहे. पण त्याला चाल लावली गेली नाही. तरीही आज ते गीत गाताना अंगावर शहारे येतात. माझी पीढी कुसुमाग्रजांच्या त्या कविता गाऊन मोठी झाली. अशा या कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन साजरा केला जातो…
२७ फेब्रुवारी रोजी हा दिन उत्साहात साजरा केला जाईल… माझी मराठी माऊली म्हणजेच संत ज्ञाानेश्वर… तिथपासून ते कुसुमाग्रज यांच्यापर्यंत ही मराठी भाषा गौरवाची… अभिमानाची… आिण अमृताशी पैजा जिंकणारी…. आज आग्रह आहे की, या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा… तो मिळणे सोपे नाही. ज्यांचा आग्रह आहे. की मराठीलाअभिजात भाषेचा दर्जा मिळावा, त्यांनाही ‘अभिजात’म्हणजे नेमके काय हे माहिती नाही. तो दर्जा केंद्र सरकार देणार… देशातील सहा भाषांना हा दर्जा आहे. त्यामध्ये तािमळ, संस्कृत, कानडी, तेलगु, मल्याळम आणि उडिया यांचा समावेश आहे. अभिजात दर्जा मिळण्याचे निकष केंद्र सरकारने ठरवलेले आहेत. त्यासाठी दीड हजार वर्षांपूर्वीचा त्या भाषेतील प्राचीन ग्रंथांचा मुख्य निकष आहे. मराठी भाषा ते निकष किती पुरे करेल, हे आज सांगता येत नाही. त्यामुळे अिभजात भाषेचा दर्जा केंद्र सरकार लगेचच देईल, असे भाबडेपणे समजू नये.
मुख्य प्रश्न भाषेला अिभजात दर्जा मिळण्यापेक्षा मराठी भाषा ही ज्ञाानभाषा होणे याला अधिक महत्त्व आहे. आज ती ज्ञाान भाषा नाही. हे मान्य केले पाहिजे. मराठीचा स्वािभमान असावा… पण वृथा अभिमान नसावा. मराठी भाषा कुठे कमी पडते आहे आिण त्याला कोण कारणीभूत आहे, हे समजून घेतले पाहिजे.. मुळामध्ये मराठी भाषेचा उदय संस्कृत भाषेच्या प्रभावाखाली झाला. संस्कृतची प्राकृत भाषा झाली. सातवाहनच्या पैठण साम्राज्याने मराठी भाषेचा प्रथम वापर केला. तिथपासून मराठी भाषेचा प्रसार सुरू झाला. संत ज्ञाानेश्वरांनी संस्कृतमधील गिता प्राकृतामध्ये आणली. आिण अमृताशी पैजा जिंकण्याची मराठीला स्फूर्ती दिली. संत ज्ञाानेश्वर माऊलींचे काम फार मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठी साम्राज्य स्थापन करताना मराठी भाषेला राजाश्रय दिला… हा सगळा इतिहास देशाला मािहती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळताना महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब या तीन राज्यांचा त्याग सगळ्यात मोठा होता. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्र सरकारने अधिकृत राज्यभाषेचा दर्जा मराठी भाषेला दिला. १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर त्यावेळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ‘मराठी असल्याचा शासकीय आदेश जारी केला… तो ११ जानेवारी १९६५ रोजी.’ १ मे १९६६ चे वसंतराव यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेले भाषण आजही वाचून पहावे… त्यांनीच चार प्रादेशिक स्तरावर मराठीची सक्ती केली. राज्य कारभार मराठी भाषेतून चालणार, हे ही त्यांनीच जाहीर केले. महाराष्ट्र दिन -१ मे साजरा करताना त्याचे स्वरूप मराठी भाषा दिन असे नसले तरी महाराष्ट्राचा जयजयकारच त्या दिवशी होत होता. प्रत्यक्षात ‘मराठी भाषा दिन’ हा २१ जानेवारी १९१३ रोजी शासकीय आदेशाने साजरा करण्याचा निर्णय झाला आिण कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी तो करावा, असाही निर्णय झाला. तेव्हापासून २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन साजरा केला जातो.
भारतीय राजघटनेत २२ अधिकृत भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. आणि महाराष्ट्रात राज्य सरकारची एकमेव अधिकृत राजभाषा मराठी आहे. गोवा राज्यामध्ये बोलतात मराठी पण अधिकृत राजभाषा कोकणी आहे. दादरा-नगरहवेली केंद्रशासीत प्रदेश आहे. तिथे अिधकृत राजभाषा मराठी आहे. महाराष्ट्राबाहेर गोवा (पणजी), बडोदे, गुलबर्गा, इंदूर, दिल्ली येथे मराठी उच्च शिक्षण विभाग आहेत. महाराष्ट्राबाहेर एकूण १५ विद्यापीठांत मराठी भाषा शिकवली जाते. जगात ७२ देशांत मराठी भािषक प्रामुख्याने आहेत. त्यात मॉरेशीस आिण इस्त्राईलमध्ये बाजारपेठेतही मराठी भाषा बोलली जाते. अमेिरका, युरोप, आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांतही मराठी भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. तिथे मराठी सांस्कृतिक केंद्रेही आहेत. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षांत अमेरिकेतील अशाच मराठी सांस्कृितक केंद्रांनी यशवंतराव चव्हाण यशवंतराव जन्मशताब्दीिनमित्त माझी दहा व्याख्याने अमेिरकेत आयोिजत केली होती आणि त्या व्याख्यानांना ३०० पर्यंत मराठी भाषिक उपस्थित होते. श्री. ठाणेदार,
श्री. संदीप वासलेकर, बोस्टचे श्री. बाळ महाले यांनी फार मेहनत घेतली. वॉिशंग्टनला तर संजय पुरी या बिगर मराठी भाषिकाने केवढा कार्यक्रम आयािजत केला होत….
२७ फेब्रुवारी हा जगभरात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचा सर्वांनाच आनंद आहे. पण दोन मुद्द्यांची चर्चा आवश्यक आहे…. मराठीला अभिजात दर्जा मिळावा याचा आग्रह ठीक आहे…. पण तो मिळणे सोपे नाही. त्याच्या निकषात मराठी कमी पडते आहे. मला स्वत:ला असे वाटते की, अभिजात भाषेच्या दर्जापेक्षासुद्धा मराठी ज्ञाानभाषा होणे हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठी मराठी माणूस नेमके काय करीत आहे? भाषाप्रेमी काय करत आहेत? साहित्य संमेलनाचे अध्यक्ष काय करतात? मराठी साहित्य परिषदा काय करतात? रोजच्या व्यवहारात मराठी भाषा बोलण्याचा आग्रह आपण किती धरतो…? रोजच्या व्यवहारात आपण किती इंग्रजी शब्द वापरतो… मुंबईमध्ये प्रत्येक मराठी माणूस बस्थांब्यावर असो किंवा रेल्वेमध्ये असो…. हिंदीतच बोलायला सुरुवात करतो… पदोपदी इंग्रजी शब्द आपण वापरतो… घाईने जाणारा माणूस सांगत असतो की, “अरे, हॉस्पीटलमध्ये चााललो आहे…. आईला अॅडमीट केले आहे… सिर्यिस आहे, आयसीयूमध्ये आहे… उद्या आॅपरेशन आहे… ” विज्ञानाचा भाषा उपयोग करताना मराठी खूप मागे पडत आहे… संगणकाच्या जगात मराठी खूपच मागे पडत आहे. माझ्या िपढीला ‘अ’- अननसातला शिकवला गेला… आता ‘अ’- अपलोड अस शिकवला जातो. मला ‘ड’ शिकवताना गुरुजी सांगायचे, डमरूतला ‘ड’ आता ’ डाउनलोड मधला आहे. संगणकीय संदर्भातील कोणताही शब्द बघा… फॉरवर्ड, मेसेज, सेव्ह, सेंड, मेल, रिसिव्ह, कॉल, कॉपी सगळेच शब्द आपण सर्रास इंग्रजीच वापरतो. त्याला पर्यायी शब्द नाहीत. इंग्रजी, उर्दु, परशीयन, हिंदी या भाषांतील सगळी उसनवारी करून आपण सर्रास शब्द उचचलेले आहेत आणि त्यांना मराठी करून टाकले आहे. माझ्यावर काय मेहरबानी करतोस काय… यातील मेहरबान हा शब्द आपला नाही. खिडकी शब्द आपला नाही. अशा मराठी नसलेल्या शब्दांची यादी खूप मोठी आहे. क्रिकेटच्या खेळातील सर्वच शब्द आपन इंग्रजीत वापरतो…. अशा स्थितीत मराठी भाषा समृद्ध होणार कशी? आणि ज्ञाानभाषा होणार कशी? शिवाय मराठीबद्दल जे जे कोणी अगदी अभिमानाने बोलतात…. त्या पालकांनी आपल्या सर्व मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश घेतलेला असतो. त्यामुळे मराठीचा अभिमान बाळगताना मराठी भाषा अभिजात होणे दूरच राहिले…. ती ज्ञाानभाषा होणे त्याहून कठीण झाले आहे. इंग्रजीमधील लिपीत २६ अक्षरेच आहेत. जगामधील किती देशांत इंग्रजी बोलले जाते? अमेिरका आणि इंग्लंड… युरोपमधील सर्व देशांत युरो हे त्यांचे नाणे आहे.. पण जर्मनीमध्ये इंग्रजी बोलून बघा… डेनमार्कमध्ये इंग्रजी बोलतात का बघा… मी फ्रॅकफूटला असताना व्हेअर इज अ स्टेशन? असे इंग्रजीत विचारले… तर तो माणूस माझ्या अंगावर येवून जोरात ओरडला… इंग्रजीतच… टाॅक इन जर्मन…. मग स्टेशनचा पर्यायी शब्द
हाफबान-हाफ असा जर्मनीत असल्याचे समजले. डेनमार्कमध्येही तेच…. ते डच बोलतात. रशियातील कोणीही इंग्रजी बोलत नाही… रशियन भाषा त्यांनी ज्ञाानभाषा त्यांनी केलेली आहे. तेच फ्रान्समध्येही… तिथे फ्रेंच ज्ञाानभाषा आहे. आपल्यापेक्षा हिंदीमध्ये कितीतरी पटीने समृद्ध शब्द आहेत. मराठी भाषेचा अभिमान बाळगताना आपल्या भाषेचा ज्ञाानभाषा म्हणून टिकाव लागेल, यासाठी आपण काय करणार? किती मराठी कवितांत अन्य शब्द आहेत? खुद्द कुसुमाग्रजांनी देशाच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे झाली तेव्हा जे गीत लिहीले…. त्यातील दुसराच शब्द…
“पन्नाशीची उमर गाठली…”
‘उमर’ हा शब्द मराठी नाही. मराठी बोलताना वाक्यावाक्याला आपल्या इंग्रजी – हिंदी शब्दांची गरज लागते… आणि म्हणून मराठी भाषेचा अभिमान बाळगताना त्या भाषेला अभिजात दर्जा मिळवताना त्याचवेळी ती ज्ञाानभाषा होईल, याकरिता आपण कोणता दिन साजरा करणार आहोत? मराठी भाषा दिन जरूर साजरा करावा… पण मराठी भाषेला ज्ञाानभाषा दिन करण्याचा दिवस कोणता? हे कोण सांगू शकेल…. ?
मधुकर भावे
