🟣मलिग्रे येथे भावेश्वरी मंदिर वास्तूकशांती ७ मे ते १० मे होणार संपन्न.
🟣माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियान कार्यशाळा व टी.बी. मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
💥मलिग्रे येथे भावेश्वरी मंदिर वास्तूकशांती ७ मे ते १० मे होणार संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

मलिग्रे ता. आजरा येथे भावेश्वरी मंदिर वास्तूकशांती ७ मे ते १० मे संपन्न होत आहे. मलिग्रे येथील भावेश्वरी मंदिराचे बांधकाम पुर्ण झाले असून गुरूवार ७ मे रोजी पासून मंदीर वास्तुशांती व कलसारोहन सोहळा,धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ७ मे रोजी मुहूर्तमेढ स्थापना व धार्मिक विधी होत असून ८ मे रोजी सर्व मुर्ती व कलश मिरवणूक सकाळी ८ वा. सुरुवात होत आहे. ९मे रोजी प्रधान देवता व मुर्तीची स्थापना व धार्मिक विधी तर रविवारी १० मे रोजी महाआरती व महाप्रसादाचे वाटप होणार आहे . सलग चार दिवस गावात पाळक असून कलश मिरवणूकी करीता महिलानी सहभागी होण्याकरीता गृपप्रमाणे सहावारी, नऊवारी एकाच रंगातील साड्यांचे तर पुरुष मंडळीनी सलवार कुर्ताचे नियोजन केल्याने माहीरवाशीनी व मुंबई ग्रामस्थ सहभागी होत असल्याने गावाला यात्रेचे स्वरूप येणार आहे. भावेश्वरी मंदिर जिर्णोध्दार समितीने भावीक भक्ताना व देणगीदार याना या सोहळ्यात उपस्थित रहाणेचे आवाहन केले आहे.
🟣माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियान कार्यशाळा व टी.बी. मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी

आरोग्य विभाग, पंचायत समिती आजरा यांचे वतीने दि.३० रोजी तहसिलदार कार्यालय आजरा येथील सभागृह ” माझं गाव आरोग्य संपन्न गाव” अभियान कार्यशाळा व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत टी.बी. मुक्त भारत अभियान अंतर्गत टी.बी.मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प. स. सभापती सौ. जयश्री गाडे होत्या. सदर कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासना वतीने राबविणेत येत असलेल्या ” माझं गाव – आरोग्य संपन्न गाव ” या अभियानाची माहिती, अभियानाचे ध्येय, आरोग्य विषयक बाबी, कुटूंब नियोजन साधनांचा वापर, वैशिष्टे, निकष, बक्षिसे, मेळावे, कालावधी, अभियानाचे स्तर / टप्पे इ. विषयक माहिती देवून मार्गदर्शन करणेत आले. तसेच सदर अभियानाची जनजागृती करणेत आली. सदरचे अभियान दि.०१/०४/२०२६ ते दि.३१/०३/२०२७ या कालावधीत राबविणेत येणार आहे. तसेच आजरा तालुक्यातील एकूण ३७ ग्रामपंचायती टी. बी. मुक्त झालेल्या आहेत. त्यामध्ये सुवर्ण-०४ ग्रा.पं., रौप्य-१५ ग्रा.पं., कास्य-१८ ग्रा.पं. अशा एकूण ३७ ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र व म. गांधी यांचा पुतळा मान्यवरांच्या हस्ते वितरीत करणेत आला.
सदर कार्यक्रमांचे स्वागत श्रीमती मनिषा भांडकोळी, BNO यांनी केले. कार्यशाळेची माहिती डॉ. रविंद्र गुरव, तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली. आभार कौस्तुभ पाटील, आरोग्य सेवक यांनी मानले. ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प. स. सभापती सौ. जयश्री गाडे होत्या. यावेळी उपसभापती सौ. यशोदा पोवार जि. प. सदस्य सुधीर देसाई, शिरीष देसाई, तसेच प. सदस्य, विकास चोथे, समीर पारधे पं.स. सदस्य, आजरा तहसीलदार समीर माने, गट विकास अधिकारी सुभाष सावंत गट डॉ.रविंद्र गुरव ता. आरोग्य अधिकारी पं. स. आजरा, प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकिय अधिकारी, तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य विभागाकडील अधिकारी, कर्मचारी, आशा गट प्रवर्तक उपस्थित होते.
