मराठी भाषा गौरवदिनानिम्मित .- आजरा मनसेने राबवलं मराठी स्वाक्षरी अभियान.
आजरा. प्रतिनिधी.
मराठी भाषा गौरवदिनानिम्मित आजरा मनसेने राबवलं मराठी साक्षरी अभियान. या अभियानाला आजरा येथील, शिवाजी महाराज, संभाजी महाराज चौकात अभियान घेत आजरा तालुक्यातील नागरिकांच्या मराठीत स्वाक्षरी आजरा मनसे पदाधिकारी यांच्या मराठी उपस्थित आजरा शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी मराठीत स्वाक्षरी करून दाखवली व अभियानाला प्रतिसाद दिला मराठी भाषा गौरवदिनानिम्मित भारत देश विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो. हजारो बोलीभाषा बोलणारा जगातील एकमेव देश म्हणून भारताची ओळखआहे.
इंग्रजांनी भारतावर दीडशे वर्ष राज्य करून देश सोडताना चाणाक्षपणे आपली भाषा मात्र भारतात कायम ठेवून गेले ,त्याभाषेपुढे भारतातल्या स्थानिक भाषा मात्र फारशा विकसित झाल्या नाहीत ,हिंदी आपली राष्ट्र भाषा मानतो पण त्याही भाषेला संपूर्णदेश व्यापता आलेला नाही ,याबाबत खूप वादविवाद सतत चालू असतात विविध भारतीय भाषांमध्ये सकस साहित्य निर्मिती झाली आहे. पण शिक्षणाच्या माध्यमाबाबत इंग्रजीने सर्व प्रादेशिक भाषांना मागे टाकले आहे. इंग्रजी किंवा मराठी सारख्या स्थानिक भाषा या विषय माध्यम भेदामुळे समाजात एक नवीन विषमता निर्माण होत आहे. आणि ही विषमता अर्थात राज्यपुरस्कृत आहे. भाषिक विकासासंदर्भात सर्व भाषा समान आहेत असे भाषा विज्ञान सांगते,परंतु प्रत्येक भाषेचे सामाजिक राजकीय आणिआर्थिक स्थान वेगवेगळे असते,लोकभाषेपेक्षा भाषेच्या उपयुक्ततेवर लोक अधिक प्रेम करतात, शिक्षणाचे माध्यम म्हणून बहुभाषिक समाजात भाषा निवडीचे खुले स्वातंत्त्र दिले जाते. तेव्हा स्वाभाविकच सामाजिक प्रतिष्ठा असलेल्या आणिआर्थिक विकासाच्या संधी देणाऱ्या प्रबळ भाषेला प्रथम पसंती मिळते. कारण स्वभाषेच्या सक्षमीकरणापेक्षा लोकांना स्वतः च्या सक्षमीकरणाची जास्त काळजी असते इंग्रजी ही जागतिक संपर्काची आणि संधीची भाषा असल्यामुळे तिला आधी उच्चभ्रू समाजाने आणि आता बहुजन समाजाने पसंती दिल्याचे दिसते
मातृभाषेतील शिक्षणाचे गोडवे गाऊन किंवा मातृभाषेतुन शिक्षण घेऊन महान पदाला पोहोचलेल्या व्यक्तींची उदाहरणे देऊन भागणार नाही तर मातृभाषेची उपयुक्तता वाढून ,इंग्रजी प्रमाणे मातृभाषेतआर्थिक विकासाची संधी वाढवण्याची क्षमता निर्माण झाली पाहिजे, अर्थात हे सरकारने मनावर घेण्यासाठी जनतेचा दबाव महत्वाचा आहे. या धोरणाने मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आजरा मनसे पदाधिकारी यांच्या माध्यमातून मराठी स्वाक्षरी करण्याचे अभियान राबवले गेले. या अभियानासाठी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर सुपल तालुका अध्यक्ष अनिल निऊगरे, महिला आघाडी उपाध्यक्ष पुनम भादवणकर, ता. अध्यक्ष सरिता सावंत, उपाध्यक्ष तेजस्विनी देसाई, आनंदा घंट्टे, तसेच वसंत घाटगे, प्रदिप पाटील, सह मनसेचे पदाधिकारी मनसैनिक शाखाअध्यक्ष यांनी सहभाग घेतला होता.
