मडिलगेतील दुसऱ्या टप्प्यातील बांधकाम कामगार पेटी वाटप. – कार्यक्रम संपन्न.
आजरा. प्रतिनिधी.
आजरा मडिलगे येथील बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मिळणाऱ्या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. दि. २५ रोजी येथील शंकरलिंग मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखाना संचालक वसंतराव धुरे होते. प्रास्ताविक परूळेकर सर यांनी केले. स्वागत साधना आनंदा घाटगे यांनी केले. यावेळी प्रमुख पाहुणे के. व्ही. येसणे म्हणाले मडिलगे गावाला वसंतराव धुरे यांच्या माध्यमातून मंत्री हसन मुश्रीफ यांनी कधीही निधी कमी पडू दिला नाही. गावामध्ये भरपूर विकास कामे केली परंतु मागील काही वर्षात प्रामाणिकपणाने काम करत असताना आमच्या कामाबाबत मनामध्ये शंका निर्माण झाल्याने थोडासा दुरावा निर्माण झाला. आम्ही राष्ट्रवादीची कधीही दूर गेलो नाही परंतु आमच्या प्रामाणिकपणावर शंका घेणे हे थोडंसं आम्हाला दुखावले गेले यापुढे एकत्र काम करून राष्ट्रवादीशी सर्वजन एकनिष्ठ राहूया व नाम. हसन मुश्रीफ यांचे हात बळकट करू व गावचा विकास करू. दि. २६ रोजी होणाऱ्या विकास लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे अवाहन यावेळी श्री येसणे यांनी केले.
यावेळी बांधकाम कामगारांची २५० नोंदणी झाली होती. यामध्ये २१५ लाभार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पेटी वाटप करण्यात आल्या. यावेळी माजी सरपंच दीपक देसाई, पांडुरंग मुंज, माजी उपसरपंच बापू निऊगरे, तसेच जी. एस. पाटील, रघुनाथ नेसणे शामराव कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी आनंदा घाटगे यांच्या माध्यमातून युवराज येसणे, शशिकांत शिंदे, दिलिप सुतार, किरण येसणे, गणेश देसाई, सौरभ ढोकरे, सचिन भाईगडे, सुधाकर कातकर, रणजित जाधव. सुधीर सावंत सह मित्रमंडळी यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
आभार आनंदा घाटगे यांनी मानले.
