भालचंद्र कांगो यांच्या उपस्थितीत लोकशाहीर व. ना. गव्हाणकर पुरस्कार शाहीर संभाजी भगत यांना प्रधान.
आजरा – प्रतिनिधी.
लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्काराचे वितरण डॉ भालचंद्र कांगो यांच्या हस्ते मृत्युंजयकार शिवाजी सावंत दालन येथे दि २ रोजी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला .
अध्यक्षस्थानी मुकुंदराव देसाई होते. स्वागत युवराज पोवार यांनी केले तर प्रास्ताविक कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई यांनी केले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री देसाई म्हणाले स्वतंत्र पूर्व काळापासून राजकारणामध्ये सांस्कृतिक वसा जपला होता. राज्याची देशाची सद्याची परिस्थिती लोकशाही सोडून चालली आहे. लोकशाही जिवंत ठेवून देशात राज्यात काम केले पाहिजेत. यावेळी शाहीर संभाजी भगत यांना पुरस्कार सोबत दिलेले मानधन अध्यक्षांच्या कडे परत देण्यात आले. सदर रक्कम ही समितीकडे देण्यात आली. यावेळी पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. भालचंद्र कांगो म्हणाले कम्युनिस्ट चळवळीला शंभर वर्षे पूर्ण झाली. सन. १९४२ सालापासून सशस्त्र क्रांती असे समजून कमेंट पक्षाने काम केले होते. देशात प्रमुख विरोध पक्ष काम करत होता. सद्यस्थितीत देशात सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाती संघर्ष बाजूला ठेवून लोकशाही जिवंत ठेवली पाहिजेत कारण आता देशात दोन विचारांची लढाई सुरू आहे. माणसांचे प्रश्न दुय्यम होत आहेत हा राष्ट्रवाद चालू आहे.
या समाजामध्ये माणसासाठी उत्पादन असले पाहिजेत, उत्पादनासाठी माणसाचा वापर इतरांच्या विचारणे होत आहे जोपर्यंत स्वतःच्या विचाराने व माणसाच्या विचाराप्रमाणे देशातील सत्ताधारी काम करत नाहीत तोपर्यंत लोकशाही राहणार नाही. शेतकरी व भांडवलदारांमधील संघर्ष चालू आहे. आता तरी माणसाने स्वतःच्या विचाराने काम करावे.
पुरस्कर्ते शाहीर संभाजी भगत पुरस्काराला उत्तर देताना म्हणाले. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सरकारने काम केले पाहिजेत. ब्रिटिशापेक्षा वाईट काळ येत आहेत. व घटना घडत आहेत. या राजकारणाचा जनमानसात काय परिणाम होत आहे. याचा विचार करून पर्याय उभा राहिला पाहिजेत संस्कृतिक राजकारणाचा विचार करून हा लढा उभारलेला पाहिजे असे बोलताना श्री भगत म्हणाले. यावेळी कॉम्रेड देसाई यांनी डॉ. भालचंद्र कांगो कार्यक्रमाचा हेतू श्री. कांगो यांच्या बद्दल माहिती सांगताना म्हणाले. श्री. कांगो हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षाचे केंद्रीय नेते असून भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे ते राष्ट्रीय सचिव आहेत. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि हरियाणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. विद्यार्थी दशेपासूनच डॉ. कांगो हे डाव्या चळवळीत सक्रिय राहिले आहेत. वैद्यकीय पदवी प्राप्त झाल्यानंतर डाव्या चळवळीत पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय त्यांनी केला. आयुष्यभर कष्टकरी, कामगार, शेतकरी यांच्या न्याय हक्कासाठी ते संघर्ष करीत आले आहेत. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राची जबाबदारी समर्थपणे पेलल्यामुळे पक्षाने त्यांना केंद्रीय सचिव मंडळात घेत चार राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. डॉक्टर भालचंद्र कांगो हे ज्या पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. त्याच पक्षात लोकशाहीर गव्हाणकर यांनी आपले आयुष्य घालवले आहे. सातत्याने कष्टकरी, श्रमिक, कामगारांच्या लढयात ते अग्रभागी राहिले आहेत. आपल्या शाहिरीने कामगार कष्टकऱ्यांच्या वेदना दुःख मांडत त्यांच्या मुक्तीची गाणे शाहीर गात राहिले. एक अभ्यासू कॉम्रेड म्हणून त्यांची पक्षांमध्ये नोंद घेतली जात होती. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवण्यात आपले वैचारिक योगदान दिले आहे त्याचप्रमाणे भालचंद्र कांगो हेही कष्टकरी, कामगारांच्या लढ्याबरोबरच डाव्या चळवळीत तरुणांना घडवण्यात पुढाकारात राहिले आहेत. म्हणूनच त्यांच्या हस्ते हा पुरस्कार शाहीर संभाजी भगत यांना देण्याचा निर्णय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी समितीचे सचिव सुनील पाटील, डॉ नवनाथ शिंदे, प्रा. सुनील शिंत्रे, संभाजी पाटील, मीना मंगळूरकर, युवराज पोवार, कॉम्रेड संजय तर्डेकर, पुष्पलता घोळसे, कृष्णा सावंत, काशिनाथ मोरे, रोहित शेंडे, रवींद्र भाटले, संजय घाटगे, विक्रम देसाई, अमित सामंत यांच्यासह कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.




