बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा.- गुजरातमध्ये, 28 बँकांना 22,842 कोटींचा चुना.
तर गुजरातमध्ये नीरव मोदी,मेहुल चोक्सीपेक्षा मोठ्या घोटाळ्याचा भांडाफोड; बँकांना २२,८४२ कोटींचा चुना. – लावणाऱ्या एबीजी शिपयार्डविरोधात गुन्हा दाखल! तर ABG शिपयार्ड कंपनीच्या एकूण आठ जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
वृत्तसंस्था. गुजरात
बँक इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा समोर आला आहे. ABG शिपयार्डने तब्बल 28 बँकांना 22,842 कोटी रुपयांचा चुना लावल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच CBI ने ABG शिपयार्ड आणि त्याचे तत्कालीन अध्यक्ष ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अन्य 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विजय माल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, पंजाब नॅशनल बँक घोटाळा अशी आत्तापर्यंत उघड झालेल्या मोठमोठ्या घोटाळ्यांची यादी नेहमीच बातम्यांमध्ये चर्चेत असते. या सर्व घोटाळ्यांनी ऐकणाऱ्या सगळ्यांचेच डोळे पांढरे केले होते.मात्र, आता याहून मोठ्या एका घोटाळ्याचा भांडाफोड गुजरातमध्ये झाला आहे. एकूण २८ बँकांना तब्बल २२,८४२ कोटींचा चुना लावणाऱ्या एबीजी शिपयार्ड या कंपनीविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी दिवसभर या कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयकडून छापेमारी सुरू होती! हा आत्तापर्यंत उघड झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक मानला जात आहे.
एएनआयनं दिलेल्या माहितीनुसा, सीबीआयनं एबीजी शिपयार्ड विरोधात आणि कंपनीच्या संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एकूण २८ बँकांची तब्बल २२ हजार ८४१ कोटींना फसवणूक केल्याचा आरोप या कंपनीवर लावण्यात आला आहे. या प्रकरणात सीबीआयनं शनिवारी दिवसभर कंपनीच्या कार्यालयांवर धाडसत्र राबवलं. एबीजी शिपयार्ड कंपनीसोबतच कंपनीचे संचालक रिशी अग्रवाल, संथानम मुथुस्वामी आणि अश्विनी कुमार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
👉काय आहे एबीजी शिपयार्ड?
एबीजी शिपयार्ड ही कंपनी मोठी जहाजं बनवणे आणि ती दुरुस्त करण्याच्या व्यवसायात आहे. या कंपनीचं मुख्यालय केंद्र गुजरातच्या दहेज आणि सुरतमध्ये असल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे. एबीजी शिपयार्ड लिमिटेड या कंपनीचे मुख्य संचालक रिशी अग्रवाल आहेत. सुरतमधील कंपनीच्या शिपयार्डमध्ये तब्बल १८ हजार डेड वेट टनेज क्षमतेची जहाजं बांधण्याची क्षमता आहे. तर दुसरीकडे दहेजमधील शिपयार्डमध्ये १ लाख २० हजार डेड वेट टनेज (DWT) ची जहाजं बांधण्याची क्षमता आहे.एबीजी शिपयार्डशी संबंधित मुंबईतील काही ठिकाणी देखील सीबीआयनं छापेमारी केल्याची माहिती एएनआयनं दिली आहे.
नेमका काय आणि कसा झाला घोटाळा?
यासंदर्भात सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियानं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टनुसार, एप्रिल २०१२ ते जुलै २०१७ या कालावधीमध्ये आरोपींनी एकमेकांशी संगनमत करून बेकायदेशीर कृत्य, निधी बँकेनं दिलेल्या कारणाव्यतिरिक्त दुसरीकडे वळवणे अशा गोष्टी केल्याचं समोर आलं आहे.
हजारो कोटींचं कर्ज.
एबीजी शिपयार्डवर सध्या एसबीआयचं २ हजार ९२५ कोटी, आयसीआयसीआय बँकेचं ७ हजार ०८९ कोटी, आयडीबीआयचं ३ हजार ६३४ कोटी, बँक ऑफ बडोदाचं १ हजार ६१४ कोटी, पीएनबीचं १ हजार २४४ कोटी आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचं १ हजार २२८ कोटी रुपयांचं कर्ज आहे.
गेल्या १६ वर्षात एबीजीएसएलनं एकूण १४६ जहाजं बांधली. यापैकी ४६ जहाजं निर्यात व्यवसायासाठी बांधण्यात आली आहेत. न्यूजप्रिंट कॅरिअर, सेल्फ डिसचार्जिंग अँड लोडिंग बल्क सिमेंट कॅरिअर, फ्लोटिंग क्रेन्स, इंटरसेप्टर बोट, डायनॅमिक पोजिशनिंग डायविंग सपोर्ट व्हेसल्स अशा अनेक प्रकारच्या जहाजांचा समावेश आहे. भारत आणि विदेशातीलही अनेक कंपन्यांना एबीजीनं जहाजं विकली आहे. २०११मध्ये एबीजीनं नौदलाकडून देखील जहाज बांधणीचं कंत्राट मिळवलं होतं. मात्र, कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तेव्हा हे कंत्राट रद्द झालं होतं.
एसबीआयने केलेल्या तक्रारीनुसार, शिपयार्ड कंपनीने एसबीआय बँकेचे 7089 कोटी, आयडीबीआय बँकेचे 3634 कोटी रुपये, बँक ऑफ बडोद्याचे 1614 कोटी रुपये, पंजाब नॅशनल बँकेचे 1244 कोटी रुपये आणि 1228 कोटी रुपये इंडियन ओवरसीज बँकेकडून घेतले आहेत. याआधी 8 नोव्हेंबर 2019 रोजी बँकेकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावर सीबीआयने 12 मार्च 2020 रोजी स्पष्टीकरण मागवले होते. ऑगस्ट 2020 मध्ये बँकेकडून आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. जवळपास दीड वर्षांपेक्षा जास्त तपास केल्यानंतर सात फेब्रुवारी 2022 रोजी सीबीआयने कारवाई सुरु केली.सीबीआयने ऋषी कमलेश अग्रवाल यांच्याशिवाय संथानम मुथास्वामी, अश्विनी कुमार, सुशील कुमार अग्रवाल , रवी विमल नेवेतिया आणि अन्य एकाविरोधात गुन्हेगारी कट, फसवणूक, गुन्हेगारी विश्वासाचा भंग आणि अधिकृत गैरवर्तन यासारख्या गुन्ह्यांसाठी खटला दाखल केला.

या बॅंकांना फटका..
एसबीआयची २ हजार ४६८, आयसीआयसीआय बँकेची ७ हजार ८९, आयडीबीआय बँकेची ३ हजार ६३४, बँक ऑफ बडाेदाची १ हजार ६१४, पंजाब नॅशनल बँकेची १ हजार २४४ आणि इंडियन ओव्हरसीज बँकेची १ हजार २२८ काेटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
