“हमारा बजाज” काळाच्या पडद्याआड उद्योजक. – राहुल बजाज यांचे 83 व्या वर्षी निधन.
( तर राहुल बजाज हे 1968 मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी या पदी रुजू झाले.)
बजाज या उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्यात राहुल बजाज यांचा मोठा वाटा आहे. 2001 मध्ये राहुल बजाज यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच राहुल बजाज यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्रात ऑनर्स पदवी आणि बॉम्बे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. तर त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले होते.
बजाज ग्रुपचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.बजाज हे दीर्घकाळापासून कर्करोगाने त्रस्त होते. राहुल बजाज यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरु होते. रुबी हॉल क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुर्वेझ ग्रांट म्हणाले की, गेल्या एक महिन्यापासून ते रुग्णालयात होते. त्यांना न्यूमोनिया झाला होता आणि हृदयाचा त्रासही होता. राहुल बजाज यांनी दुपारी 2.30 वाजता अखेरचा श्वास घेतला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील जवळचे सदस्य उपस्थित होते.राहुल बजाज यांच्या पार्थिवावर उदया रविवारी दुपारी पुण्यातील नानापेठ परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कारही मिळाला आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सोशल मीडियावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली.राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी कोलकाता येथे मारवाडी उद्योगपती कमलनयन बजाज आणि सावित्री बजाज यांच्या घरी झाला. बजाज आणि नेहरू कुटुंबात तीन पिढ्यांपासून कौटुंबिक मैत्री सुरू होती. राहुल यांचे वडील कमलनयन आणि इंदिरा गांधी यांनी काही काळ एकाच शाळेत शिक्षण घेतले होते.
1965 मध्ये बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली
राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज समूहाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोची उलाढाल ७.२ कोटींवरून १२ हजार कोटींपर्यंत पोहोचली आणि स्कूटर विकणारी देशातील आघाडीची कंपनी बनली. 2005 मध्ये राहुल यांनी कंपनीची कमान मुलगा राजीवकडे सोपवण्यास सुरुवात केली. त्यांनी राजीव यांना बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक बनवले, त्यानंतर ऑटोमोबाईल उद्योगातील कंपनीच्या उत्पादनांची मागणी केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वाढली.
पहिली बजाज स्कूटर गॅरेजच्या शेडमध्ये बनवली
देशातील नंबर टू टू व्हीलर ब्रँड बजाजचे मूळ स्वातंत्र्य लढ्याशी जोडलेले आहे. जमनालाल बजाज (1889-1942) हे त्यांच्या काळातील एक यशस्वी उद्योगपती होते ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यातही भाग घेतला होता. स्वातंत्र्यलढ्यात ते महात्मा गांधींचे ‘भामाशाह’ होते. 1926 मध्ये त्यांनी ट्रेडिंग करण्यासाठी त्यांना दत्तक घेणाऱ्या सेठ बच्छराज याच्या नावाची एक फर्म बच्छराज अँड कंपनी स्थापन केली. 1942 मध्ये वयाच्या 53 व्या वर्षी त्यांच्या निधनानंतर, त्यांचे जावई रामेश्वर नेवातिया आणि दोन मुले कमलनयन आणि रामकृष्ण बजाज यांनी बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनची स्थापना केली.1948 मध्ये, कंपनीने आयात केलेल्या घटकांपासून एकत्रित केलेल्या दुचाकी आणि तीन चाकी वाहने बाजारात आणली. पहिली बजाज व्हेस्पा स्कूटर गुडगावमधील गॅरेज शेडमध्ये बनवण्यात आली होती. यानंतर बच्छराज ट्रेडिंग कॉर्पोरेशनने कुर्ला येथे उत्पादन कारखाना उभारला जो नंतर आकुर्डी येथे हलविण्यात आला. येथे बजाज कुटुंबाने फिरोदियाझसोबत भागीदारी करून दुचाकी आणि तीनचाकी वाहने तयार करण्यासाठी स्वतंत्र संयंत्रे उभारली. 1960 मध्ये कंपनीचे नाव बदलून बजाज ऑटो असे करण्यात आले.
बजाजचे बुकिंग नंबर विकून लोकांनी लाखो कमावले.
लहान कुटुंबांसाठी आणि लहान व्यापार्यांसाठी अतिशय योग्य, कमी किमतीच्या आणि कमी देखभालीसह बजाज ब्रँडच्या वेस्पा स्कूटर इतक्या लवकर लोकप्रिय झाल्या की 70 आणि 80 च्या दशकात लोकांना बजाज स्कूटर खरेदी करण्यासाठी 15 ते 20 वर्षे वेटिंग करावी लागत होती. त्या काळात अनेकांनी बजाज स्कूटरचे बुकिंग नंबर विकून लाखो कमवले आणि घरे बांधली.
पद्मभूषण आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मानही मिळाला
2001 मध्ये त्यांना उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना ‘नाइट ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान देखील प्रदान करण्यात आला आहे. 2006 ते 2010 या काळात ते राज्यसभेचे सदस्यही होते. राहुल बजाज यांची 1979-80 आणि 1999-2000 मध्ये दोनदा कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती, प्रणव मुखर्जी यांनी त्यांना 2017 मध्ये जीवनगौरवसाठी CII अध्यक्ष पुरस्कार प्रदान केला.
👉बजाज ऑटोच्या यशात मोलाचा वाटा.
राहुल बजाज सन 1968 मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले. यानंतर 30 व्या वर्षी जेव्हा राहुल बजाज यांनी ‘बजाज ऑटो लिमिटेड’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला, तेव्हा हे पद मिळविणारे ते सर्वात तरुण भारतीय असल्याचे सांगितले जाते. यानंतर बजाजने एका निरंकुश पद्धतीने उत्पादन केले आणि स्वत:ला देशातील सर्वांत मोठ्या कंपन्यांपैकी एक बनविण्यात यश मिळविले. वर्ष 1965 मध्ये 3 कोटींच्या उलाढालीवरून सन 2008 मध्ये बजाजने सुमारे 10 हजार कोटींची उलाढाल गाठली.
