चंदगड. प्रतिनिधी.
शिनोळी (ता. चंदगड) येथे बेकायदेशीरपणे चालवलेल्या ऑनलाईन जुगार अड्यावर पोलिसांनी छापा मारून बेळगाव शहर परिसरातील सहा संशयितांवर गुन्हा दाखल केला. चंदगड तालुक्यातील शिनोळी येथे सदर जुगार अड्डा बेकायदेशीररित्या सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीवरून पोलिसांनी टाकली असता येथे जुगार अड्डा सुरू असल्याचे निदर्शनास आले .विजय बळवंत माने (रा. विजयनगर हिंडलगा), इरषाद मुगुटसाब मजगाव (लक्ष्मीनगर काकती), समीर मुस्तफा पाशा (वडगाव विष्णू गल्ली), आशीफ आब्बास अली बागवान (लक्ष्मीनगर काकती), रमेश यलाप्पा चौगुले (खादरवाडी) व विश्वनाथ वरपे (विजयनगर हिंडलगा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडील रोख रक्कम व इतर साहित्य मिळून २७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. शिनोळी फाटा ते शिनोळी खुर्द गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कॉम्प्लेक्समध्ये बालाजी ऑनलाईन लॉटरी या नावाने बिगरपरवाना हा व्यवसाय सुरू होता. या प्रकरणातील संशयित विजय बळवंत माने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जागा मालक विश्वनाथ वरपे याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात