Homeकोंकण - ठाणेयुरोप,अमेरिकेतील कोरोना वाढीमुळे चिंता;.- BMC ने केली 'ही' मागणी.

युरोप,अमेरिकेतील कोरोना वाढीमुळे चिंता;.- BMC ने केली ‘ही’ मागणी.

मुंबई. प्रतिनिधी. २५

मुंबई दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरू लागल्याने आता व्यवहार सुरळीत होत आहेत. मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या घटत असून उपचाराधीन रुग्णसंख्याही कमी होत आहे. मात्र जगभरात अमेरिकेसह रशिया आणि युरोप खंडात कोरोनारुग्ण वाढत आहेत. त्यामुळे येत्या काळात या देशांतून, मुंबईत पर्यटन वा अन्य कोणत्याही कारणाने येणाऱ्या प्रवाशांकडून कोरोनाचा फैलाव होण्याची भीती आहे. तेथील कोरोनाच्या प्रकाराविषयी अधिक चिंता भेडसावत असून तेथील ‘जिनोम सिक्वेन्सिंग’चे अहवाल मागवा,अशी मागणी पालिकेने राज्याच्या टास्क फोर्सकडे केली आहे.

मुंबईत डिसेंबरमध्ये लग्नसराई, नाताळ, नवीन वर्षांच्या पार्ट्यांची रेलचेल असते. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढलेल्या देशातून येणाऱ्या पर्यटकांमधून येथे पुन्हा वेगाने कोरोना फैलावण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळेच तेथील कोरोनाच्या विषाणूचा प्रकार नेमका कोणता असेल, हे जाणून घेण्याकडे पालिकेचा कल आहे. त्यानुसार आवश्यकता निर्माण झाल्यास त्यावर उपाय करता यावेत, म्हणून पालिकेने अमेरिका, रशिया, युरोपमधील करोनाचे जिनोम सिक्वेन्सिंगचे अहवाल मागवावेत, अशी शिफारस पालिकेने राज्याच्या कोरोना टास्क फोर्सकडे केली आहे. त्यातून विषाणू प्रकार, बाधा होण्याचे प्रमाण आणि उपचाराची दिशा निश्चित करण्याकडे कल असेल. विमानतळावर खबरदारी सध्याच्या स्थितीत करोना रुग्ण वाढलेल्या देशातून येणाऱ्या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसमात्रा घेतल्या नसल्यास त्यांची छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आरटीसीपीआर चाचणी आणि सात दिवस गृह विलगीकरण केले जात आहे. त्यापूर्वी, कोरोना वाढल्याने हवाई प्रवासावर निर्बंध आणण्यात आले होते. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर आणि भारताने ९६ देशांशी केलेल्या करारानंतर आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास सुरू झाला आहे. सध्या मुंबईत विमानतळावर देशांतर्गत आणि परदेश पर्यटक मिळून सुमारे ३० हजार प्रवासी येतात. तसेच, पालिकेने गेल्या वर्षभरात विमानतळावर ४ लाख २० हजार चाचण्या केल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.