मी जाईल तिकडे गुलाल आहे..- सगळीकडे मीच म्हणणाऱ्यांनी आता तरी थांबले पाहिजे.- पेरणोली जि प उमेदवार.- विष्णुपंत केसरकर.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा येथील होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दि. २७ रोजी निवडणुकीच्या उमेदवारांची माघार झाली. यामध्ये तालुक्यातील काही दोन्ही जिल्हा परिषद व चार पंचायत समिती मधील काही माघार घेतलेल्या उमेदवारांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला असले बाबत शिंदे शिवसेना ता. प्रमुख संजय पाटील यांनी माहिती दिली.
शिवसेना शिंदे गटाचे पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार आजरा कारखाना संचालक विष्णुपंत केसरकर म्हणाले, मी जिथे जाईन तिथे गुलाल असतो. मागील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जिल्ह्यातील नेत्यांच्या साक्षीने जिल्हा परिषद उमेदवारीचा मला शब्द दिला होता. मात्र तो शब्द पाळला गेलेला नाही. हा प्रकार म्हणजे लबाडाचे आवातन जेवल्याशिवाय खरं नाही. असा आहे. जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांना सर्वच सत्ता स्थानी आपल्याकडे ठेवायचे आहेत. निवडणुकीतील ऋणातून उतराई होण्याचा कोणताही प्रयत्न ते करत नाहीत. आगामी गोकुळ दुध संघ, जिल्हा बँक निवडणुकीसाठीच्या वेगळ्या पॅटर्नची मुहूर्तमेढ या निवडणुकीच्या माध्यमातून रोवली गेलेली आहे.

यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उत्तर जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार विठ्ठल उत्तूरकर, तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी आपली भूमिका मांडली.
विरोधक गाजराची शेती करण्याचे काम करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत सोयीसाठी कार्यकर्त्यांना पुढील निवडणुकीच्या उमेदवारी चे आश्वासन देवून ठेवायचे व निवडणुका आल्या की मीच उमेदवार म्हणून पुढे यायचे अशी काही मंडळींची सवय आहे. सगळीकडे मीच म्हणणाऱ्यांनी आता तरी थांबले पाहिजे, असे अभिषेक शिंपी बोलताना म्हणाले. आजरा येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना शिंदे गटाची पत्रकार परिषदेत झाली .
स्वागत इंद्रजीत देसाई यांनी केले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे उत्तर जिल्हा परिषद मतदार संघाचे उमेदवार विठ्ठल उत्तूरकर, तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, शहर प्रमुख विजय थोरवत, पंचायत समिती उमेदवार सतीश फडके, रणजीत सरदेसाई, बाळ केसरकर, संतोष भाटले, जितेंद्र भोसले, राजू पोतणीस, विलास पाटील, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. श्री देसाई यांनी आभार मानले.




