🟣हिवाळी अधिवेशन आणि लाडक्या बहिणींना मिळणार या तारखेला 2100 रुपये…..पहा..
🛑पेरणोली येथील प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय. ( गावकरी एकवटले,२४, २५ व २६ जानेवारी २०२६ तीन दिवस साजरा होणार शताब्दी. )
🟣हिवाळी अधिवेशन आणि लाडक्या बहिणींना मिळणार या.. तारखेला 2100 रुपये…
नागपूर :- प्रतिनिधी.

गेल्या वर्षी महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला सुरू होऊन एका वर्षाचा काळ झाला आहे. मात्र ही योजना पाहता-पाहता अवघ्या काही दिवसांमध्येच लोकप्रिय झाली. खरे तर ही योजना महाराष्ट्राच्या आधी मध्य प्रदेश मध्ये ही ठरली होती आणि त्याच धर्तीवर राज्यात योजना सुरू झाली आणि महाराष्ट्रात सुद्धा ही योजना हिट राहिली आहे. या योजनेच्या जोरावर लोकसभा निवडणुकीत अपेक्षित कामगिरी करता आलेले नसतानाही विधानसभा निवडणुकीत मोठा उलट फिर आपल्याला पाहायला मिळाला आणि महायुतीला जबरदस्त बहुमताने आपल सरकार स्थापन करता आले. विशेष म्हणजे या योजनेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुद्धा सुरू असतात. सरकार देखील अशा चर्चा सातत्याने सुरू ठेवते. ही योजना ज्यावेळी सुरू झाली त्यावेळी विधानसभा निवडणुकीचा काळ होता आणि योजना सुरू करताना सरकारने भविष्यात या योजनेतून पात्र ठरणाऱ्यांना 2100 रुपयांचा लाभ दिला जाईल अशी घोषणा केली.
सध्या या योजनेतून पात्र ठरणाऱ्यांना पंधराशे रुपयांचा लाभमिळतोय. आता महायुतीचे सरकार स्थापित होऊन बरेच दिवस झाले आहेत, पण तरीही 2100 रुपये प्रति महिना बाबत योग्य तो निर्णय झालेला नाही आणि यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ज्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर आपल्याला पाहायला मिळू शकतो विशेषता महानगरपालिका निवडणुकांमध्ये आणि पंचायतीच्या
निवडणुकांमध्ये याचा सर्वाधिक प्रभाव आपल्याला दिसेल असे
माध्यमातून येत्या हिवाळी अधिवेशनात सरकार काही मोठा निर्णय घेणार का? हिवाळी अधिवेशनापासून लाडक्या बहिणींना एक विषय रुपयांचा लाभ मिळणार का असे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः अपडेट दिली आहे. निवडणुकीदरम्यान महायुतीने लाडक्या बहिणींना सन्मान निधी रक्कम 2100 रुपये प्रतिमहिना करण्याचे आश्वासन दिले होते. पण सत्तेत आल्यानंतरही अद्याप यावर अंतिम निर्णय झालेला नाही. यामुळे महिला वर्गात तीव्र संतापाची लाट पाहायला मिळत असून सरकारांची फसवणूक करत असल्याचे अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतय. दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारतर्फे आयोजित चहापान कार्यक्रमावर विरोधकांनी बहिष्कार टाकत सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
शेतकरी संकट, महिला सुरक्षा आणि बेरोजगारी या मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधकांनी अधिवेशन वादळी होणार असल्याचे संकेत दिले. याच कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी विरोधकांवर पलटवार करत त्यांच्या पत्रकार परिषदेला “निराशेने भरलेली” अशी टीका केली. सरकार सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयार असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. याच दरम्यान एका पत्रकाराने लाडकी बहीण योजनेतील वाढीवनिधीबाबत प्रश्न उपस्थित केला. महायुतीने निवडणुकीपूर्वी दिलेल्या वाढीच्या आश्वासनाची अंमलबजावणी कधी होणार, असे विचारल्यावर फडणवीस म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ.
🛑पेरणोली येथील प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय. ( गावकरी एकवटले,२४, २५ व २६ जानेवारी २०२६ तीन दिवस साजरा होणार शताब्दी. )
आजरा.- प्रतिनिधी.

१९२५ साली सुरू झालेल्या पेरणोली केंद्रशाळेला यावर्षी शंभर पूर्ण होत असून यानिमित्ताने पेरणोली केंद्रशाळेचा शताब्दी महोत्सव लोकोत्सवच्या स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.दि २४,२५ व २६ जानेवारी तीन दिवस महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
पेरणोली केंद्रशाळेने गेल्या शंभर वर्षात पेरणोलीसह साळगाव, हरपवडे, कोरिवडे, देवकांडगाव या गावातील अनेक विद्यार्थी घडवले. अनेक क्षेत्रात त्यांनी स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. इंजिनियर, डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकारांसह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेकांनी शाळेचे नाव उंचावले आहे. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने या साऱ्याचा धांडोळा घेण्यात येणार आहे.
याबरोबरच अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. येणाऱ्या पाच वर्षांचा रोडमॅप बनवून त्याआधारे शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक सुधारणेसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी एक व्यापक समिती बनवली असून वेगवेगळ्या उपसमित्याही बनवल्या आहेत. समन्वयक म्हणून उदय कोडक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बैठकिला उदय पवार, कॉ संपत देसाई, तानाजी देसाई, पांडुरंग लोंढे, राजेंद्र सावंत, उदय कोडक, मारुती वरेकर,इनांस फर्नांडिस, वंदन जाधव, कृष्णा सावंत, काका देसाई, आदेश गुरव, अविनाश वर्धन, अविनाश जोशीलकर, संतोष येरुडकर, सुरेश कालेकर संजय मोहिते, पांडुरंग दोरुगडे, सचिन देसाई, संकेत सावंत, दीपक देसाई, विठ्ठल मस्कर, सुभाष देसाई, अमित सावंत, रणजित फगरे, रणजित कालेकर, व्ही डी जाधव, अरुण जाधव यांच्यासह ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
