Homeकोंकण - ठाणेजिल्हा परिषद शाळेत शिक्षक घरी घेतोय विश्रांती तर "डमी शिक्षिका” मुलांना करतेय...

जिल्हा परिषद शाळेत शिक्षक घरी घेतोय विश्रांती तर “डमी शिक्षिका” मुलांना करतेय आद्यापन. गट.शि. अधि. केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक याच्या चौकशीची होतेय मागणी.( तर काही जिल्ह्यातील शासनाने शाळेसाठी दिलेले संगणक काही – शिक्षकांच्या घरी.)

जिल्हा परिषद शाळेत शिक्षक घरी घेतोय विश्रांती तर “डमी शिक्षिका” मुलांना करतेय आद्यापन. गट.शि. अधि. केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक याच्या चौकशीची होतेय मागणी.
( तर काही जिल्ह्यातील शासनाने शाळेसाठी दिलेले संगणक काही – शिक्षकांच्या घरी.)

सोलापुर. – मंगळवेढा.-प्रतिनिधी.

तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस येत असून, लाखभर पगार घेणाऱ्या शिक्षकाने तब्बल चार महिन्यांपासून शाळेत न हजेरी लावता केवळ ७ हजार रुपयांवर खासगी शिक्षिकेला आध्यापनासाठी नेमल्याचा गंभीर आरोप होत असुन त्या शिक्षिकेस आध्यापनाची परवानगी देणाऱ्या, गटशिक्षण आधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी सुज्ञ पालक वर्गातुन होत आहे.

जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजकुमार मेतकुटे यांनी व्हि.डी.ओ. चित्रणाद्वारे हा प्रकार उजेडात आणत शाळेतील बोगस कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. राजकुमार मेतकुटे यांनी थेट शाळेत जाऊन संबंधित महिलेशी संवाद साधला असता, आपण गेल्या चार महिन्यांपासून येथे सात हजार रुपये पगारावर काम करत असून कोष्टी गुरुजी यांच्या जागी अध्यापन करत असल्याची कबुली त्या शिक्षकीने दिली आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे. यानंतर मेतकुटे यांनी मुख्याध्यापकांशी संपर्क साधून विचारणा केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे न देता स्वयंसेवक असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त दाखवून विद्यार्थ्यांच्या नावावर मिळणाऱ्या पोषण आहारातही घोटाळा होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
सध्या मंगळवेढा तालुक्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासत असून, एक शिक्षक मिळावा यासाठी ग्रामस्थ व पालक गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या फेऱ्या मारत आहेत. अशा परिस्थितीत नियमित पगार घेणारे शिक्षक घरी बसून “डमी शिक्षक” पाठवत असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण व शाळेची शिस्त दोन्ही धोक्यात आली आहे. डमी शिक्षिकेला अध्यापनाची परवानगी देणारे मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख हे कोणत्या अधिकारात हा प्रकार खपवून घेत आहेत, याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे मत मेतकुटे यांनी व्यक्त केले. संबंधित शिक्षकाला पाठीशी घालणारे गटशिक्षण आधिकारी व मुख्याध्यापक तात्काळ चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी शिक्षण विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गेली तिने महिने “भोगस शिक्षिका” शाळेवर आद्यापनाचे काम करीत आसताना गटशिक्षण अधिकारी नेमके काय करीत होते? तालुक्यातील शाळावर त्यांच नियंत्रण नाही का? संतापजनक सवाल पालक करीत आहेत.

कोट शिक्षक संख्या कमी असल्याने दोन ते अडीच महिन्यापासून शाळेत शिक्षिका शिकवण्यास येत आहे. याबाबत तक्रार येताच त्यांना बंद करण्यात आले आहे. बिरा माने मुख्याध्यापक जि.प. लक्ष्मी दहिवडी शाळा..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.