शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी.- वन विभाग शिंदे सेना – आजरा.- यांची संयुक्त बैठक.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वन विभागातील विविध प्रश्नाबाबत पालकमंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांच्या सूचनेनुसार आजरा वनविभाग व शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाच्या वतीने दि. ३० रोजी आजरा वन कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावरती योग्य मार्ग काढून मदत मिळण्यासाठी डी एफ ओ श्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती.
सदर बैठकीमध्ये वन हक्क दावे जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर लवकरच बैठक घेऊन निकाली काढणे बाबतचीचर्चा करण्यात आली.
त्याचबरोबर ऊस पिकाची नुकसान भरपाई त्या एका वर्षापर्यंत देण्याचे ऐवजी पुढील पाच वर्षे ती मिळावी याबाबत शासनाकडे पाठपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव पाठवावा असे सूचित करण्यात आले त्याचबरोबर शेती अवजारे व घरातील घराच्या बाहेर असणारे संसार उपयोगी साहित्य चार चाकी वाहने यांचे नुकसान हत्ती करत आहेत.
त्यांना मिळणारी मदत ही तूटपूंजी असून त्याला त्याबाबत जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी पाठ पुरवठा करणे बाबतच्या सूचना करण्यात आल्या ज्या गावाला वन नाही पण वनाला लागून असणाऱ्या गावांच्या लगत गाव आहेत. त्यांना वन खात्याच्या सिलेंडर सारख्या योजनांची लाभ मिळत नाही. ते लाभ मिळणे साठी सूचित करण्यात आले वनहद्दी मध्ये ज्या जमिनी अतिक्रमित आहेत.
त्या नियमानुकूल करणे बाबत व त्यांना नुकसान भरपाई ची लाभ मिळण्याबाबत चे धोरण स्पष्ट करावे अशी सुचित करण्यात आले .नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नही शासनाशी निगडित असून काही बाबत धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे आहे.
असे पाटील यांनी सुचित केले. या बैठकीला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत शहर प्रमुख विजय थोरवत आत्म कमिटीचे अध्यक्ष इंद्रजीत देसाई, संतोष दिवेकर सह पदाधिकारी, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट
शेतकऱ्यांच्या बाजूने तालुकाप्रमुख संजय पाटील यांनी शेतकऱ्यांशी निगडित प्रश्नाचे विचारणा केली. वन विभागाला काही प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. वृक्ष तोड, तळी दुरुस्ती सरी दुरुस्ती, नवीन तारेचे कुंपण याबाबतीत आपलं धोरण काय आहे.
हत्ती पूर्णपणे हाकलून लावण्या संदर्भात त्याचबरोबर गव्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भातल्या तूमच्या उपयोजना काय आहेत याबाबतच्या प्रश्न उपस्थित केले. हत्ती उसकावण्याचे अजून एक पथक शिरसींगी वाटंगी परिसरामध्ये तैनात करणे बाबतच्या सूचना करण्यात आल्या लवकरच वरिष्ठांची चर्चा करून सदर बाबतचे पथक देण्याची मागणी तत्वता मान्य करण्यात आली. वन हक्क दाव्या संदर्भातल्या कायदेशीर बाबी वरती भर देऊन लवकरात लवकर न्याय देण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रशासनाच्या वतीन वन अधिकारी श्री. सावंत, वनरक्षक श्री. शिंदे, श्री. निकम व सर्व बिट चे कर्मचारी उपस्थित होते.
‘सदर बैठकीच्या संदर्भात झालेली चर्चा व आढावा लवकरच पालकमंत्री महोदयांच्या समोर मांडून पंधरा दिवसांमध्ये मा. जिल्हाधिकारी व वन विभागाचे संयुक्त बैठक बोलून वन हक्क जमीनी संदर्भातील दावे निकाली काढण्यासंदर्भात मागणी करणार आहे असल्याचे सांगितले.

