शेतकऱ्यांच्या कर्जमाफी आंदोलनाला.- आजरा शेतकरी कृती समितीचा पाठींबा.
आजरा.- प्रतिनिधी.
नागपूर येथे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी आम. बच्चू कडू व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या आंदोलनाला
आजरा तालुका कृती समितीने पाठिंबा दिला आहे पाठिंबा दिला आहे. याबाबतचे निवेदन आजरा तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अतिवृष्टी, महापूर, हमीभावाचा, वन्य प्राण्यांनी केली नुकसान अभाव अशा शेतकऱ्यांच्या प्रलंबित विषयाबाबत शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकरी जगाचा पोशिंदा आहे हा पुन्हा उभा राहावा यासाठी संपूर्ण कर्जमाफी द्यावी.
असे निवेदनात म्हटले आहे व या नागपूर येथे चालू असलेल्या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा देण्यात आला आहे.
या निवेदनावर शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई, शिवसेनेचे संभाजी पाटील, युवराज पोवार, कॉम्रेड शिवाजी गुरव,संजय तरडेकर, सह शेतकरी कृती समितीच्या सदस्यांच्या सह्या आहेत.
