🟣मंदीराचे दरवाजाचे कुलूप तोडून, गज काढून.- चव्हाणवाडी – जोमकाई देवी मंदिरात, स्वामी समर्थ मंदीरात व रेणुका देवी मंदीरात चोरी.
🟣महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त मुंबई यांच्याकडे आजरा नगरपंचायत मतदान वाढीची तक्रार.
🛑मंदीराचे दरवाजाचे कुलूप तोडून, गज काढून.- चव्हाणवाडी – जोमकाई देवी मंदिरात, स्वामी समर्थ मंदीरात व रेणुका देवी मंदीरात चोरी.
आजरा.- प्रतिनिधी.
मंदीराचे दरवाजाचे कुलूप तोडून, गज काढून चव्हाणवाडी येथील जोमकाई देवी मंदिरात, स्वामी समर्थ मंदीरात व रेणुका देवी मंदीरात येथे चोरी करण्यात आले आहे. याबाबतची
फिर्यादी समर्थ सचिन गुरव वय 22, व्यवसाय पुजारी, रा. महादेव गल्ली उत्तुर, ता आजरा. यामधील आरोपी नाव व पत्ता-अज्ञात चोरटा आहे.
दि.29/10/2025 रोजी 19.00 वा ते दि. 30/10/2025 रोजी सकाळी 08.00 या चे दरम्यान मुदतीत चव्हाणवाडी ता. आजरा गावातील जोमकाई देवी मंदिरात, तसेच स्वामी समर्थ मंदीरात व रेणुका देवी मंदीरात चोरी होऊन
जोमकाई देवी मंदीरात चोरीस गेले साहित्य
1) 20330/- रू. त्यात 200 ग्रॅम वजनाचे जोमकाई देवीच्या मुर्तीच्या हातातील चांदीचे त्रीशुळ जु.वा.कि.स.
2) 150/- रू त्यात धातुचा कलश जु.वा.किं.स.
3) 40000/-रू – त्यात 300 ग्रॅम वजनाच्या जोमकाई देवीच्या चांदीच्या एक जोड पादुका जु.वा.कि.स
एकूण – 70150/-रू
स्वामी समर्थ मंदीरात चोरीस गेले साहित्याचे वर्णन पुढीलप्रमाणे-
40000/- रु किंमतीच्या 300 ग्रॅम वजनाच्या चांदीच्या एक जोड पादुका जु.वा.कि.स, – 8000/- रु त्यामध्ये दानपेटीतील 10, 20, 50, 100, 500 रु दराच्या चलनी नोटा अंदाजे
एकुण-48000/- रु
रेणुका देवी मंदीरात चोरीस गेले साहित्याचे वर्णन पुढीलप्रमाणे-
3500/- रू.- त्यात 25 ग्रॅमची चांदीची रेणुका देवीची मुर्ती जु.वा.कि.स., – 18500/- रू – त्यात 125 ग्रॅम वजनाची चांदीची प्रभावळ जु.वा.किं.स. – 25000/-रू – त्यात रेणुका देवीच्या गळ्यातील पावलीभार वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र जु.वा.कि.स, – 2000/- रु – त्यामध्ये दानपेटीतील 10, 20, 50, 100, 500 रु दराच्या चलनी नोटा अंदाजे , एकूण -49000/- रू
तिन्ही मंदीरातील चोरीस गेलेला एकुण माल 167150/- रु – मिळाला माल-00.00
या चोरीतील हकीकत दि २९ रोजी कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी हे पुजारी असले जोमकाई देवी मंदीरात

तसेच साक्षीदार नामे संतोष बाळु चोरगे वय 43, रा. चव्हाणवाडी ता. आजरा हे पुजारी असले स्वामी समर्थ मंदीरात व साक्षीदार तानाजी कृष्णा पाटील मुळ रा. आरळगुंडी ता. भुदरगड सध्या रा. चव्हाणवाडी तिट्टा ता. आजरा हे पुजारी असले रेणुका देवी मंदीरात चव्हाणवाडी ता. आजरा येथुन दरवाजाचे कुलूप तोडून, दरवाजाचे स्टिलचे गज काढुन तिन्ही मंदीरात प्रवेश करुन वर नमुद वर्णनाचे व किंमतीचे सोने चांदीचा वरील वर्णनाचा माल व रोख रक्कम असे एकुन 167150/- रु किंमतीचा माल फिर्यादीचे व साक्षीदार यांचे संमती शिवाय लबाडीचे इराद्याने चोरून नेलेबाबत फिर्यादी यांनी फिर्याद दिलेने गुन्हा दाखल करत सदर गुन्ह्याचा पुढील तपास आपण स्वता मा. स.पो.नि. यमगर सो हे करीत असून गुन्ह्याची एक प्रत मा. कोर्टात रवाना करणेची तजवीज ठेवली आहे.
दाखल म पो हे को 2039 मुगडे तपास-स पो नि यमगर सो
भेट देणारे अधिकारी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो गडहिंग्लज विभाग, स पो नि यमगर अधिक तपास करत आहेत.
🟣महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त मुंबई यांच्याकडे आजरा नगरपंचायत मतदान वाढीची तक्रार.
मुंबई.- प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त मुंबई यांच्याकडे आजरा नगरपंचायत मतदान वाढीची तक्रार आज गुरुवार दि. ३०/१०/२०२५ रोजी महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त मुंबई यांच्याकडे आजरा नगर पंचायतीमध्ये बाहेरील मतदान घालण्यात आले त्याबद्दल व अशी ट्रान्सफर मतं निवडणुकीचा गळा कशी चिरतात हे दाखवण्यात आले त्याबाबतचा तक्रार अर्ज आज महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त मुंबई यांच्याकडे देण्यात आला सदर बाबीची योग्य चौकशी करून त्या त्या स्वायत्त्य संस्थेस त्याबाबत कळविण्यात येईल असे आश्वासन मिळाले याबाबतचे तक्रारीचे निवेदन महाराष्ट्र राज्य पुणे विभागीय संपर्कप्रमुख सुनील शिंदे यांनी मुंबई निवडणूक आयुक्त कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून देण्यात आले तेव्हा समस्त आजरेकर बंधू-भगिनींना विनंती आहे की आपण सुद्धा याबाबत अशा खोट्या व मतलबी मतदारांना नगरपंचायतीमध्ये मतदान करण्यास विरोध करावा अशा प्रकारची मतदान बाहेरून आणून जर का कोणी राजकीय व्यक्ती आपल्याला फसवत असेल तर ती व्यक्ती कोणीही असो कोणत्याही गटातटायची असो कोणत्याही पक्षाचे असो अशा माणसांना पाच वर्षे घरात बसवल्याशिवाय आजरा नगरपंचायतीचा विकास होणार नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिव शाहू फुले आंबेडकरांचा आहे हे विसरू नका आपले मत विकू नका असे सुनील शिंदे आजरा यांनी निवडणूक आयुक्त दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
