HomeUncategorizedजनता गृहतारण संस्थेकडून पालकमंत्र्यांच्या कडे पूरग्रस्तांन निधी सुपूर्त.🛑वीज ग्राहकांची दिशाभूल करून स्मार्ट...

जनता गृहतारण संस्थेकडून पालकमंत्र्यांच्या कडे पूरग्रस्तांन निधी सुपूर्त.🛑वीज ग्राहकांची दिशाभूल करून स्मार्ट मिटर बसवणे बंद करा – शिवसेना उबाठाचे आजरा वीज वितरणला निवेदन( अन्यथा शिवसेना स्टाईल – आंदोलन )

🛑जनता गृहतारण संस्थेकडून पालकमंत्र्यांच्या कडे पूरग्रस्तांन निधी सुपूर्त.
🛑वीज ग्राहकांची दिशाभूल करून स्मार्ट मिटर बसवणे बंद करा – शिवसेना उबाठाचे आजरा वीज वितरणला निवेदन
( अन्यथा शिवसेना स्टाईल – आंदोलन )

🛑जनता गृहतारण संस्थेकडून पालकमंत्र्यांच्या कडे पूरग्रस्तांन निधी सुपूर्त.

आजरा.- प्रतिनिधी.

मराठवाडा-विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जीवित व वित्त हानी अपरिमित झाली आहे. लोकांचे संसार उद्धव झालेत. अन्न – धान्याची, चा-याची टंचाई निर्माण झाली आहे. अशा वेळी आपल्या बांधवाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे हे परम कर्तव्य आहे. याच उदात्त भावनेतून पूरग्रस्तांना जनता सहकारी गृहतारण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाखाचा धनादेश आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. संस्थेचे चेअरमन मारुती मोरे यांनी हा धनादेश दिला.

यावेळी बोलतांना ना. प्रकाश आबिटकर म्हणाले, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी महाराष्ट्रातील दानशूर व्यक्ती, संस्था संघटनानी उभे राहण्याची गरज आहे, हे ओळखून आपल्या आजरा येथील जनता गृहतारण संस्थेने मदतीचा हात पुढे केला, अनेक सहकारी व सामाजिक संस्थासाठी हा आदर्श आहे. संस्था नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रो. (डॉ.) अशोक बाचूळकर, संस्थेचे संचालक व गारगोटी शाखेचे चेअरमन आनंद चव्हाण, व्हाईस चेअरमन डॉ. संजय देसाई, संचालक महादेव मोरुस्कर, सत्यजित चोरगे, रणजित पाटील, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार, व्यवस्थापक दत्तात्रय शिंदे आदी उपस्थित होते.

🛑वीज ग्राहकांची दिशाभूल करून स्मार्ट मिटर बसवणे बंद करा – शिवसेना उबाठाचे आजरा वीज वितरणला निवेदन
( अन्यथा शिवसेना स्टाईल – आंदोलन )

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

आजरा महावितरण वेळोवेळी सूचना व निवेदन देऊन देखील स्मार्ट मिटरचे आजरा शहरासह गावोगावी मागणी नसताना लादत फिरत आहेत.
वीज ग्राहकांमध्ये या स्मार्टमीटर विषयी अजूनही संभ्रम आहे. काहीजण हे स्मार्टमीटर बसवून घेतले आहेत तर काहीजण या स्मार्ट मीटरला विरोध केल्याने त्या जागी अजून पूर्वीचेच वीजमीटर आहेत. लोकांची दिशाभूल करून महावितरण कंपनी स्मार्ट मीटर बसवीत असल्याचा आरोप करीत जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविणे बंद करा नाहीतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देत शिवसेना उबाठाने महावितरणला निवेदन दिले आहे.
आजरा तालुक्यामध्ये वीज कंपनीकडून गावोगावी तसेच आजरा शहरातून काही ठिकाणी जाऊन कंपनीचे कर्मचारी भागातील नागरिकांना चुकीची माहिती देऊन कोणत्याही
नागरिकांना पूर्व सूचना न देता घराघरात स्मार्ट मीटर बसवत आहेत. त्याचबरोबर स्मार्ट मीटर बसवले तर बिल कमी येणार, आता बसवून घेतले नाही तर पुन्हा पैसे भरून हे मीटर बसवून घ्यावे लागणार अशी भीती घालून तसेच चुकीची माहिती देऊन सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करून स्मार्ट मीटर बसवत असल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. सदरचे प्रकार तातडीने थांबवण्यात यावेत, न थांबवलेस शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
परंतु ज्यांचे मीटर बदललेले आहेत याबाबत भूमिका काय असणार? याबाबतही ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे तसे
जर यात काही दोष नसेल तर याबाबत वीज अधिकाऱ्यांनीही
आपली ठोस भूमिका मांडावी आणि संभ्रम दूर करावेत असे मीटर बदललेल्या ग्राहकांचे म्हणणे आहे.
यावेळी संभाजी पाटील (उपजिल्हा प्रमुख), ता. प्रमुख युवराज पोवार, युवा सेना महेश पाटील, आजरा शहर प्रमुख ओंकार मद्याळकर, विभाग प्रमुख दिनेश कांबळे तालुकाप्रमुख संजय येसादे, सुयश पाटील, अमित गुरव, रोहन गिरी, बिलाल लतीफ, सागर नाईक, हरिश्चंद्र व्हरकटे, रवी यादव, सुरेश होडगे सह शिवसेना युवा सेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.