HomeUncategorizedराज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा 2025 सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे...

राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा 2025 सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे उत्साहात संपन्न( कनेरी मठाच्या पावन आणि त्यात विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावना आणि आरोग्यदायी स्पर्धात्मकतेचा उत्सव.)

🛑राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा 2025 सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे उत्साहात संपन्न
🛑क्रीडा, आरोग्य आणि संस्कारांचा संगम — राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा सिद्धगिरीत भव्य समारोप.

🛑राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा 2025 सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे उत्साहात संपन्न
( कनेरी मठाच्या पावन आणि त्यात विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा भावना आणि आरोग्यदायी स्पर्धात्मकतेचा उत्सव.)

कणेरीमठ. प्रतिनिधी (कोल्हापूर)

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक आणि सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूट, कणेरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा 2025 या भव्य स्पर्धांचे उद्घाटन दिनांक 10 व 11 ऑक्टोबर 2025 रोजी सिद्धगिरी मठाच्या पावन सानिध्यात अत्यंत उत्साहात पार पडल्या. या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान मठाचे 49 वे मठाधिपती परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा. श्री प्रकाशराव आबिटकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर अतिथींचा सत्कार व स्वागत समारंभ पार पडला. या प्रसंगी पहिल्या दिवशी डॉ. देवेंद्र पाटील, राजकुमार पाटील, एम डी पाटील, विजय सनगर, यशोवर्धन बारामतीकर, गुंडोपंत वड, विवेक शेट्ये, निशांत पाटील, विविध वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयांचे शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आरोग्य मंत्री नाम. प्रकाशराव आबिटकर यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले क्रीडा ही केवळ जिंकण्यासाठी नसून शिस्त, मेहनत आणि संघभावना शिकवणारी जीवनशैली आहे. डॉक्टर आणि नर्सिंग विद्यार्थी म्हणून आरोग्य टिकवण्यासाठी खेळ हा आपल्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग असला पाहिजे. या दोन दिवस चालणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये अॅथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, भालाफेक, उंच उडी अशा विविध प्रकारांचा समावेश होता. महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, नागपूर अशा अनेक जिल्ह्यातील वैद्यकीय व नर्सिंग संस्थांमधील विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी होते.

या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मा. विवेक सिद्ध यांनी केले, तर आभार डॉ वर्षा पाटील यांनी मानले. उद्घाटन सोहळा संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या जल्लोषपूर्ण उपस्थितीत विविध क्रीडा प्रकारांना प्रारंभ झाला.

🛑क्रीडा, आरोग्य आणि संस्कारांचा संगम — राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचा सिद्धगिरीत भव्य समारोप.

कणेरी. प्रतिनिधी (कोल्हापूर)

दोन दिवस चाललेल्या राज्यस्तरीय आंतर विभागीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धा 2025 चा समारोप समारंभ दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी काडसिद्धेश्वर हायस्कूल,कणेरी येथे अत्यंत दिमाखात पार पडला. या समारोप समारंभास परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजी, महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. श्री हसन मुश्रीफ साहेब, तसेच प्राध्यापक डॉ. मिलिंद निकुंभ (प्र-कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक) उपस्थित होते.

समारोप प्रसंगी विजेत्या खेळाडूंना व संघांना मेडल्स, प्रशस्तीपत्रे आणि पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मा. हसन मुश्रीफ म्हणाले परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी मला एका अत्यंत चांगल्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले, याचा मला आनंद आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेतील सर्व विजेत्या खेळाडूंचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यात स्वागत करतो. दोन दिवसांत केलेल्या मैदानाच्या सजावटीसाठी आणि उत्तम नियोजनासाठी मी आयोजकांचे विशेष कौतुक करतो.

हरलेल्यांनी हार न मानता पुन्हा प्रयत्न करावेत, कारण प्रयत्नशील व्यक्तीच खऱ्या अर्थाने विजेते असतात.
कणेरी मठाला तेराशे वर्षांचा वैभवशाली इतिहास लाभला आहे. सिद्धगिरी हॉस्पिटलच्या माध्यमातून गोरगरिबांना कमी दरामध्ये उपचार उपलब्ध करून देणे, हजारो मुलांना दत्तक घेऊन त्यांना अधिकारी बनविणे आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून हजारो मुलींना स्वावलंबी बनविणे — हे सिद्धगिरी संस्थानचे अतुलनीय कार्य आहे.
दोन दिवसांचे हे असाधारण नियोजन हे ईश्वरीय शक्तीचे प्रतीक आहे. अशा ठिकाणी येणे ही प्रेरणादायी बाब आहे.

या प्रसंगी परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी आपल्या आशीर्वचनात सांगितले डेव्हलपमेंट स्पर्धेच्या होत नाही, खेळातून एक मनोभावना तयार होते. राष्ट्रीय भावीक्य निर्माण करणारा हा खेळ आहे. या खेळातून परस्परांचा परिचय होतो, एक नवीन नातं तयार होतं. हरलेल्यांच्या त्यागामुळे जिंकलेल्यांचा विजय होतो.
शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा यांचा संगम समाजाला सबल बनवतो. सिद्धगिरी संस्थान शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सातत्याने जनहिताचे कार्य करत राहील.

या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. देवेंद्र पाटील, राजकुमार पाटील, एम डी पाटील, विजय सनगर, यशोवर्धन बारामतीकर, गुंडोपंत वड, गुरुनाथ पांगम,विवेक शेट्ये, निशांत पाटील, अलका शेट्ये, सुजित पाटील, प्रसाद नेवरेकर, रेगिना सातवेकर यांच्यासह महाराष्ट्र भरातून विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते

या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सिद्धगिरी नर्सिंग इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी, तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिकारी व क्रीडा विभाग यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, संघभावना, शिस्त आणि नेतृत्वगुण वृद्धिंगत झाल्याचे सर्व मान्यवरांनी नमूद केले. समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन विवेक सिद्ध यांनी केले, तर आभार यशोवर्धन बारामतीकर यांनी यांनी मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.