Homeकोंकण - ठाणेमंत्री नितेश राणेंवर आरोप करत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कारभार चव्हाटय़ावर आणणारे माजी...

मंत्री नितेश राणेंवर आरोप करत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कारभार चव्हाटय़ावर आणणारे माजी आमदार राजन तेलीं – शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर – शुक्रवारी कुडाळ येथील आमदार निलेश राणे संपर्क कार्यालयात – तेलींचे केले जल्लोषात स्वागत.

🟥मंत्री नितेश राणेंवर आरोप करत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कारभार चव्हाटय़ावर आणणारे माजी आमदार राजन तेलीं – शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर – शुक्रवारी कुडाळ येथील आमदार निलेश राणे संपर्क कार्यालयात – तेलींचे केले जल्लोषात स्वागत.

कुडाळ :- प्रतिनिधी

शिवसेनेमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे कुडाळ येथील आमदार निलेश राणे संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, माजी आमदार राजन तेली यांच्या पाठीशी संघटना उभी राहील त्यांचे राजकीय योगदान लक्षात घेता पक्षाला फायदा होईल असे त्यांनी सांगितले.

मंत्री नितेश राणेंवर आरोप करून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कारभार चव्हाटय़ावर आणणारे माजी आमदार राजन तेली यांनी दसरा मेळाव्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला हा प्रवेश झाल्यानंतर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले. त्यांचे स्वागत कुडाळ येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केले.

यावेळी आमदार निलेश राणे, उपनेते संजय आंग्रे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, माजी महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, ओंकार तेली, युवा सेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर,महिला शहर प्रमुख श्रुती वर्दम, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता व नगरसेवक विलास कुडाळकर,नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, रचना नेरुरकर, राकेश कांदे, युवा सेनेचे स्वरूप वाळके, संदेश नाईक, मिलिंद नाईक, देवेंद्र नाईक आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की माजी आमदार राजन तेली यांच्यासोबत अनेक वर्ष आमचे संबंध राहिले आहेत. राजकारणात त्यांनी दिलेले योगदान विसरून चालणार नाही. पूर्वी ज्याप्रमाणे आपला पक्ष खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कुटुंब म्हणून ओळखला जात होता. तसाच आता सुद्धा हा पक्ष कुटुंब म्हणून ओळखला जाणार आहे. त्यामुळे तुमच्या सोबत आम्ही सदैव उभे राहणार आहोत. फक्त तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये आपला पक्ष वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच ते म्हणाले येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये वरिष्ठ स्तरावरून जो निर्णय होणार तो आपल्याला मान्य करावा लागणार आहे महायुती म्हणून आपल्याला निवडणूक लढवायची आहे असे त्यांनी सांगितले. तर माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले की मध्यंतरीच्या काळात काही राजकीय निर्णय घ्यावे लागले पण आता पूर्वीचे सगळे जुने राजकारणातील सहकारी एकत्र येत आहेत आणि त्यांच्यासोबत काम करण्याची पुन्हा संधी मिळत आहे निश्चित हा पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल सावंतवाडी व कुडाळ विधानसभा ही शिवसेनेकडे आहे कणकवली मतदारसंघांमध्ये पक्ष अधिक जोमाने वाढण्यासाठी प्रयत्न करणार असे त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.