आजरा. प्रतिनिधी. ०३.
आजरा वाटगी येथील
१९७६ चा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त कै. काजमिल डिसोझा गुरुजी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून डॉ. जाॅन डिसोझा यांच्या संकल्पनेतून, श्रीमती अंजेलिन इंत्रु डिसोझा यांच्या परिवाराच्या वतीने आणि संपुर्ण डिसोझा परिवार आणि त्यांचे मित्रमंडळी आणि ग्रामसचिवालय वाटंगी यांच्या सहकार्याने उभा करण्यात आलेल्या कै. काजमिल डिसोझा गुरुजी सार्वजनिक वाचन मंदिराचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री व वारणा संकुलाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या सुभहस्ते पार पडला.
यावेळी बोलताना आम. श्री. डॉ कोरे यांनी आपल्या आजोबांच्या कार्याची आठवण रहावी आणि त्यांचे कार्य पुढे ही सदैव चालू रहावे याकरिता त्यांच्या नातवंडांनी स्वीकारलेल्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले आणि मोबाईल आणि टिव्ही संस्कृतीतून बाहेर पडून वाचन संस्कृती स्वीकारावी, आजरा तालुकातील वाटंगी गावच्या दुर्गम भुमितून नवमानव घडावा अशी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त केली. यावेळी उपस्थित कोल्हापुर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मा. जयवंतराव शिंपी, आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रा. सुनिल शिंत्रे, शिवसेनेचे संग्राम कुपेकर, वाटंगीचे सरपंच शिवाजी नांदवडेकर, शिवाजी गिलबिले यांनी आपल्या मनोगतात काजमिल गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला, सार्वजनिक वाचनालयाच्या उभारणीची गरज अधोरेखित केली, आणि पुस्तक वाचन ही संस्कृती वाढावी अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन डॉ जाॅन डिसोझा तर आभार प्रदर्शन डॉ रोझारिओ डिसोझा यांनी केले. यावेळी विजय देसाई, ग्रामसेवक रणजित पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, डॉ. झेवियर डिसोझा, डॉ अनिता डिसोझा, डॉ मारीया डिसोझा, जेमी डिसोझा, रिचर्ड डिसोझा, डिसोझा परिवार व वाटंगी ग्रामस्थ, आजरा, चंदगड, गडहिंग्लज तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.