आजरा. प्रतिनिधी.०२.
आजरा तालुक्यातील धान्य दुकानदार बयाजी येडगे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड झाल्याने आजरा तालुक्यातील धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने श्री येडगे यांचा सत्कार करण्यात आला.
गरीब घराण्यातील एका तरुणाला व धान्य दुकानदार या समितीच्या सदस्य पदावर काम करण्याची संधी दिली यामुळे अशा व्यक्तीला पुन्ह काम करण्याची संधी प्राप्त होईल व जोमाने कामाला लागण्यासाठी श्री येडगे यांचा सत्कार करण्यात आला असल्याचे संघटनेचे अध्यक्ष संजय येसादे यांनी सांगितले. व त्यांना सर्व धान्य दुकानदार यांच्या वतीने भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी गुणाजी साबळे खजीनदार, भास्कर मोरे प्रमोद कांबळे, विजय पवार यशवंत दोरुगडे, संदीप सरदेसाई, धनंजय तानवडे, वसंत पवार, सागर कसलकर, छाया धनवडे, पांडुरंग धनुकटेकर सह सर्व धान्य दुकानदार उपस्थित होते.