Homeकोंकण - ठाणेवसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामार्फत होणार साखर वाटप.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामार्फत होणार साखर वाटप.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामार्फत होणार साखर वाटप.

आजरा.- प्रतिनिधी.

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्या मार्फत साखर वाटप होणार असले बाबत प्रसिद्ध पत्रक देण्यात आले आहे. दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.‌- शेअर्स रू.10,000/- व रू. 15,000/- पुर्ण असलेल्या सभासदांना व ऊस पुरवठादारांना

टनेजची साखर वाटप करणार

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यांने सन 2024-25 हंगामात गळीतास आलेल्या ऊसाला ऊस पुरवठादार शेतक-यांना त्यांनी पुरविलेल्या ऊसानुसार प्रति टन अर्धा किलो प्रमाणे व कारखान्याकडे शेअर्स भागभांडवल रक्कम कम रू.10,000/- ते रु. 15,000/- च्या आतील सभासदांना 25 किलो व रू. 15,000/- पुर्ण भरणा केलेल्या सभासदांना 50 किलो साखर प्रति किलो रू.25/- दराप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. सदर साखर आजरा तालुका खरेदी विकी संघाचे सर्व शाखेतून दि.28.04.2025 ते 31.05.2025 अखेर वाटप केली जाणार आहे.

सभासदांना त्यांची साखर वितरण कार्ड घरपोच दिली जाणार असून, सभासदांनी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स सही करून कार्ड वाटप करणेंस येणा-या कर्मचा-यांकडे देवून आपले कार्ड घेणेचे आहे. तसेच ऊस पुरवठादारांनी आपल्या संबंधित संघ शाखेशी संपर्क साधून आपले आधार कार्ड/बँक पासबुक झेरॉक्स सही करून संघ शाखेत जमा करून साखर उचल करणेची आहे. अशी माहिती कारखाना व्यवस्थापनांने दिली.

कारखान्यांने या हंगामात ठरविलेले गळीताचे उ‌द्दिष्ट नैसर्गिक अडचणीमुळे पुर्ण करता आले नांही. या हंगामात अति पावसामुळे सर्वच ठिकाणाचे 25% ऊस उत्पादन घटले त्यामुळे आपल्या कारखान्याचे देखील गळीत कमी झाले असलेंने कारखान्यापुढे आर्थिक अडचणी आहेत त्याच बरोबर शासनाचे धोरणाप्रमाणे व कारखान्याच्या उपविधी प्रमाणे शेअर्सची रक्कम रु.15,000/- पूर्ण असले शिवाय कोणतेही लाभ सभासदांना देणे अडचणीचे असतांना देखील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण सर्वांनी मागणी केलेनुसार सभासदांना साखर देणेचे वरील प्रमाणे धोरण ठरविले आहे. त्यानुसार आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे शाखेतून साखर वाटप सुरू होणार आहे.

Oplus_131072

कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ज्या सभासदांची शेअर्स रक्कम अपुरी आहे अश्या सभासदांनी आपली शेअर्स रक्कम रू.10,000/- अथवा रु.15,000/- कारखाना कार्यालयात येवून पुर्ण केलेस वरील कालावधीत त्यांनाही साखर देणेचे संचालक मंडळाचे धोरण असून, त्याचा लाभ सभासदांनी घ्यावा. त्याचबरोबर सभासद नसलेल्या कार्यक्षेत्राबाहेरील ऊस पुरवठादार उत्पादकांना देखील प्रतिटन अर्धा किलो प्रमाणे साखर उचल देत आहोत. येत्या गळीत हंगामात आपण उत्पादीत केलेला संपुर्ण ऊस कारखान्यास गाळपासाठी पाठवावा असे अवाहन कारखान्याचे चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांनी केले आहे.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते.

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.