🛑वारकरी भवन उभारणीसाठी सर्व प्रकारचे सहकार्य-
मुकुंददादा देसाई.
🛑शेतकऱ्यांना पिकांची शंभर टक्के नुकसानभरपाई दिली पाहिजे.
( आवंडी धनगरवाड्यावर बैठक )
🟥छत्तीसगडमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा.- सुरक्षा दलाची मोठी कारवाई ( ३ राज्यातील सुरक्षा दलांनी १ हजार नक्षल्यांना घेरले)
🛑वारकरी भवन उभारणीसाठी सर्व प्रकारचे सहकार्य-
मुकुंददादा देसाई.
आजरा – प्रतिनिधी.

आजरा तालुक्यात सर्व वारकरी मंडळींनी एकत्र येऊन वारकरी भवन उभारणीचा जो संकल्प केला आहे त्याला सर्व प्रकारचे सहकार्य राहील. असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई यांनी दिले ते आजरा येथे भरवलेल्या वारकरी मेळाव्यात बोलत होते. यावेळी कॉ. संपत देसाई, शिवाजी बोलके, दिगंबर देसाई यांची प्रमुख होती.
सुरवातीला रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय संस्थेचे अध्यक्ष गौरोजी सुतार यांनी प्रास्ताविक करून या मेळाव्याचा हेतू स्पष्ट केला. आपल्याला सगळ्यांच्या मदतीने वारकरी भवन उभा करायचे आहे. त्यासाठी सर्वांची मदत आवश्यक आहे.
यावेळी बोलताना कॉ संपत देसाई म्हणाले की गेले दोन तीन वर्षे वारकरी मंडळी एकत्र येऊन वारकरी भवन मांडण्याचा संकल्प करीत आहेत. त्यासाठी नगरपंचायत आणि महसूल कडे आपण जागा मागितली. तिथं जागा मिळाली नाही, पण विठ्ठलाच्या मनात आल्याने आपल्याला जागा देण्यास देहूकर मंडळी आपण हुन तयार झाली, हे भवन व्हावे ही विठू माऊलीची इच्छा आहे. ती आपण सगळे मिळून पूर्णत्वाला नेऊ.
जिल्हा शिक्षक बँकेचे संचालक शिवाजीराव बोलके म्हणाले की सर्वांना सोबत घेऊन आपण सगळे मिळून हे भवन उभा करू, आता कोणतीही अडचण यात येणार नाही. तुम्ही सगळे एकदिलाने कामाला लागा.

पांडुरंग जोशीलकर, संतु कांबळे, लक्ष्मण शिंत्रे, राजाराम जाधव यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी दीपाली गुरव, कल्पना जाधव, भिकाजी दारुटे, कोंडीबा आडे, बाबू घुरे, विश्राम निउनगरे, गंगाराम येडगे यांच्या सह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय घाटगे यांनी केले
ठराव-
बोलकेवाडी येथे देहूकर महाराजांनी देऊ केलेल्या जागेवर वारकरी भवन उभारण्याचा ठराव सर्वानुमते हात उंचावून मंजूर करण्यात आला

🛑जंगली प्राणी आणि शेतकरी संघर्ष कायमचा संपवण्यासाठी जंगल समृद्धीकरणाचा पथदर्शी प्रकल्प राबविण्याची आग्रही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्याने मुख्य वनसंरक्षक आणि उपवनसंरक्षक यांचे सोबत लवकरात लवकर बैठक घेऊन हा प्रस्ताव शासनाला सादर करण्याचा निर्णय आज आजरा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सहाउपवनसंरक्षक नवनाथ कांबळे, परिक्षेत्रवनाधिकारी मनोजकुमार कोळी यांच्यासह कॉ संपत देसाई, संजय सावंत, राजू होलम, प्रकाश मोरुस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या मोर्चे आंदोलनानंतर आज आजरा वनविभागाच्या कार्यलयात बैठक झाली. सुरवातीला कॉ संपत देसाई यांनी ही बैठक केवळ नुकसान भरपाई साठी नसून शेतकरी आणि जंगली प्राणी यांच्यातील संघर्ष कायमचा संपवण्यासाठी जंगल समृद्धीकरणाचा प्रस्ताव तातडीने राबविण्यासाठी या प्रस्तावावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन तो राज्य सरकारला सादर झाला पाहिजे असे लावून धरले. त्यानंतर सहा उपवनसंरक्षक नवनाथ कांबळे यांनी लवकरच अशी बैठक बोलवत असल्याचे सांगितले.

🛑शेतकऱ्यांना पिकांची शंभर टक्के नुकसानभरपाई दिली पाहिजे.
( आवंडी धनगरवाड्यावर बैठक )
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील शेतकऱ्यांना पिकांची शंभर टक्के नुकसानभरपाई दिली पाहिजे.
आवंडी धनगरवाड्यावर बैठक संपन्न झाली यामध्ये शेतकऱ्यांना पिकांची शंभर टक्के नुकसानभरपाई दिली पाहिजे तरच शेतकरी टिकेल, जंगलाकडची शेती पड ठेवावी लागत आहे. आवंडी धनगरवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची योजना वनविभागाने अडवली आहे. त्यावर सर्वानी तीव्र नापसंती व्यक्त करून तातडीने नळ पाणी पुरवठा योजनेचे काम करण्यास परवानगी न दिल्यास आम्ही सर्वजण जाऊन पाईप लाईन घालू अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या. त्यावर अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली.
काशिनाथ मोरे, संजय घाटगे, तुळसापा पवार, हरिबा कांबळे यांनी प्रश्नांचा भडिमार करून अधिकाऱ्यांना भेंडावून सोडले. शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कुंपण मोफत दिले पाहिजे. जंगल हद्दीत असलेल्या देवतांच्या यात्रा उत्सवासाठी परवानगी दिली पाहिजे. अशी चर्चा होऊन लवकरच बैठकीची तारीख ठरविण्याचे ठरले.

🟥छत्तीसगडमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा.- सुरक्षा दलाची मोठी कारवाई ( ३ राज्यातील सुरक्षा दलांनी १ हजार नक्षल्यांना घेरले)
रायपूर :- वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्याच्या कॅरेगुट्टा जंगल भागात मोठी नक्षलविरोधी कारवाई सुरु आहे. या कारवाईत ५ नक्षलवादी ठार झाले आहेत. देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या नक्षलविरोधी कारवाई मानली जात आहे. कारण यात छत्तीसगड, तेलंगणा आणि महाराष्ट्रातील २० हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. त्यांनी बिजापूर जिल्ह्यातील कॅरेगुट्टा जंगल भागात सुमारे १ हजार नक्षलवाद्यांना घेरले असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ही कारवाई सुमारे ४८ तास सुरू आहे. मोस्ट वॉन्टेड कमांडर हिडमा आणि बटालियन प्रमुख देवा यांच्यासह प्रमुख नक्षलवादी नेत्यांच्या हालचालीबद्दल गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई सुरू करण्यात आली. जिल्हा राखीव रक्षक दल (DRG), बस्तर फायटर्स, विशेष टास्क फोर्स (STF), राज्य पोलिसांच्या सर्व तुकड्या, केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) आणि त्यांच्या कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट ॲक्शन (CoBRA) यांच्यासह विविध तुकड्यांतील सुरक्षा कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले आहेत. नक्षलवाद्यांच्या पलायनाचे सर्व मार्ग बंद करण्यासाठी सुरक्षा दलांनी संवेदनशील छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील कर्रेगुट्टा भागाला घेरले आहे. घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला हा परिसर माओवाद्यांच्या बटालियन क्रमांक १ चा अड्डा मानला जातो.
🔴काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले होते. त्यातून त्यांनी ग्रामस्थांना डोंगरात प्रवेश न करण्याचा इशारा दिला होता. या भागात मोठ्या प्रमाणात आयईडी पेरण्यात आले असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. ३१ मार्च २०२६ पूर्वी देशातून नक्षलवाद पूर्णपणे संपवू, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला होता. ही घटना अशावेळी घडली आहे जेव्हा केंद्र सरकारने देशाला ‘नक्षलमुक्त’ करण्याचे ठरवले आहे. “३१ मार्च २०२६ पूर्वी आम्ही देशातून नक्षलवाद पूर्णतः नष्ट करू, जेणेकरून देशातील कोणत्याही नागरिकाला नक्षल्यांमुळे आपला जीव गमवावा लागू नये,” असे अमित शाह यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितले होते. यावर्षी छत्तीसगडमधील विविध चकमकींत आतापर्यंत जवळपास १५० नक्षलवाद्यांना मारण्यात आले आहे. त्यात बस्तरमधील १२४ नक्षल्यांचा समावेश आहे. केंद्रानेदेखील झारखंडमध्ये नक्षलवाद्यांवर कारवाई केली. गेल्या आठवड्यात झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात सीआरपीएफचे कोब्रा कमांडो आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले. त्यात एक कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या एका वरिष्ठ नक्षली नेत्याचा समावेश होता.