HomeUncategorizedमलिग्रे डोंगराच्या चाळोबा देवाची गुरूवारी यात्रा.🛑श्री महालक्ष्मी सार्वजनिक वाचनालय पारपोली.आयोजित,हस्ताक्षर स्पर्धा संपन्न.🔴💥तारीख...

मलिग्रे डोंगराच्या चाळोबा देवाची गुरूवारी यात्रा.🛑श्री महालक्ष्मी सार्वजनिक वाचनालय पारपोली.आयोजित,हस्ताक्षर स्पर्धा संपन्न.🔴💥तारीख पे तारीख. (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर.) – ४ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

🛑मलिग्रे डोंगराच्या चाळोबा देवाची गुरूवारी यात्रा.
🛑श्री महालक्ष्मी सार्वजनिक वाचनालय पारपोली.आयोजित,
हस्ताक्षर स्पर्धा संपन्न.
🔴💥तारीख पे तारीख. (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर.) – ४ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

आजरा.- प्रतिनिधी.

Oplus_131072

सालाबादप्रमाणे महाशिवरात्र च्या दुसर्या दिवसी चाळोबा व महादेवाची भव्य यात्रा संपन्न होते . मलिग्रे च्या पश्चिमेला दोन किलो मिटर अंतरावर चाळोबा डोंगर असून, पुर्वी पाय वाटेने डोईवर ओझं घेऊन, उन्हात डोंगर चढणे जिकिरीचे असायचे, वाटेत मोठ मोठे दगड, वेडीवाकडी वळणे, झाडे झुडपे यातून निसर्गाच्या सान्निध्यात होणारी यात्रा, वेगळाच आनंद मिळायचा, डोंगरावर गारेगार खाणे, रसी खेच, कबड्डी व ऊंच आंब्याच्या झाडावर काठीला बांधलेला नारळ, बंदुकीने फोडण्याच्या स्पर्धा बघण्याचा आनंद मिळायचा किमान शंभर एक बैलगाडीने भाविक चाळोबाच्या नावाने चांगभले असा जयघोष घालायचे. आता ट्रक्टर व मोटरसायकली डोगरावर येतात . गेल्या वर्षी पासून मलिग्रे ग्रामपंचायत, देवस्थान कमिटी व ग्रामस्थ भाविक भक्तांच्या सहकार्याने, महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. सकाळी दहा वाजता मलिग्रे येथून गावातील देवांची पुजा झाल्यावर पालखी चाळोबा डोंगर कडे प्रस्थान होते . डोंगरावरील चाळोबा व महादेव मंदिराला पाच प्रदक्षिणा घालून तेथील देवांची पुजा केली जाते. पंचक्रोशीतील आलेले भाविक साखर कापूर अगरबत्ती व तेल घेऊन देवाचं दर्शन घेतात . दुपारी देवाला गाह्राणे व नैवेद्य दिल्यानंतर महाप्रसादाचे वाटप केले जाते. यात्रेला गावातील अबालवृद्ध सह माहेर वाशिनी व पंचक्रोशीतील हजारो भाविकांना सहभागी होण्याचे आव्हान ग्रामपंचायत व देवस्थान कमिटीने केले आहे.

🛑श्री महालक्ष्मी सार्वजनिक वाचनालय पारपोली.आयोजित,
हस्ताक्षर स्पर्धा संपन्न.

आजरा.- प्रतिनिधी.

श्री महालक्ष्मी सार्वजनिक वाचनालय पारपोली ता. आजरा आयोजित हस्ताक्षर स्पर्धा संपन्न झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एस. बी. डेळेकर सर यांनी केले.
या कार्यक्रमाचे उदघाटक प्रकाश शेटगे यांच्या हस्ते करण्यात आले.
वाचनालयाच्या बॅनर चे पूजन सौ. सुचिता शेटगे व सरिता मालव मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
दिपप्रज्वलन – अशोक मालव व अर्जुन शेटगे यांच्या हस्ते करण्यात आले.
मार्गदर्शनपर मनोगत – प्रकाश शेटगे अमरजीत ढोकरे. या स्पर्धेचे आयोजक डी. एस. बी. डेळेकर सर यांनी केले होते.

स्पर्धेचे पर्यवेशक म्हणून नितीन राऊत सर यांनी काम पाहिले.

लहान गट – स्वरा शेटगे – प्रथम
ऋग्वेद ढोकरे – द्वितीय
अंकिता गुरव – तृतीय
पारस शेटगे व आयुष शेटगे – चतुर्थ

मोठा गट
सायली शेटगे – प्रथम
आकांशा शेटगे – द्वितीय
समृद्धी ढोकरे – तृतीय
संग्राम शेटगे – चतुर्थ
विजेत्यांना प्रमाणपत्र व आकर्षक पेन देण्यात आले.

यावेळी, अशोक मालव, मारुती शेटगे, संदीप मिटके, चंद्रकांत शेटगे, सुरेश ढोकरे, अर्जुन शेटगे, सचिन कांबळे, सिद्धार्थ कांबळे, शुभम शेटगे आदी उपस्थित होते.
नितीन राऊत यांनी आभार मानले. वाचनालयाचे वैशिष्ट्य –
वय वर्ष १८ पर्यंत मोफत पुस्तके वाचन.

🔴💥तारीख पे तारीख. (स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर.) – ४ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी!

मुंबई – प्रतिनिधी.

राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातील याचिकांची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात पुन्हा लांबणीवर पडली. पुढील सुनावणी मंगळवारी ४ मार्च रोजी होईल. सुनावणीनंतर निकाल लागल्यावर निवडणुकांची तयारी करण्याकरिता किमान ९० दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे निवडणूक आयोगाच्या उच्चपदस्थांचे म्हणणे आहे. यामुळेच महानगरपालिकांच्या निवडणुका पावसाळ्यापूर्वी होतील का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात राहुल वाघ तसेच प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात, अशी विनंती करणाऱ्या याचिका पवन शिंदे व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या आहेत.

या याचिकांवरील सुनावणी न्यायमूर्ती सूर्यकांत व न्यायमूर्ती एन. के. सिंग यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी (२५ फेब्रुवारी) ठेवण्यात आली होती. पण हे प्रकरण सकाळच्या सत्रात सुनावणीस आले नाही. दुपारच्या सत्रात न्यायिक कामासाठी हे खंडपीठ उपलब्ध नसल्याने या प्रकरणाची सुनावणी तातडीने घेण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांचे वकील ॲड. देवदत्त पालोदकर व राज्य शासनाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयास केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे प्रलंबित आहेत, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. देवदत्त पालोदकर, ॲड. अभय अंतुरकर, ॲड. शशीभूषण आडगावकर तर राज्य शासनाच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता काम पाहत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.