🛑प्रजापित्ता ब्रम्हाकुमारी इश्वरीय विश्वविद्यालय आजरा – संयुक्त विद्यमाने रामतीर्थ जंगल संपदा वणव्यापासून वाचवा जनजागृती.
( महाशिवरात्र यात्रेतून आवाहन)
🛑मलिग्रे डोंगराच्या चाळोबा देवाची यात्रा संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

कोणी घर देता का घर?, चोचीतील पाण्याच्या थेंबाने जंगल विझवणारी चिमणी, जंगले ही पृथ्वीची फुप्फुसे आहेत, मी आग विझवणार, अशा विविध प्रकारच्या फलकांच्या माध्यमातून, वनविभाग महाराष्ट्र शासन, सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र), प्रजापित्ता ब्रम्हाकुमारी इश्वरीय विश्वविद्यालय आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्री यात्रेनिमित्त रामतीर्थ आजरा येथे, जंगल संपदा वणव्यापासून वाचविण्यासाठीचा जनजागृती स्टॉल सुरु करण्यात आला. सरपंच परिषद मुंबई (महाराष्ट्र) यांनी वणवा निर्मूलन यासाठीची गेले दोन वर्षापासूनचा सूरु अस लेल्या मोहीमेमध्ये शाळा महाविद्यालये यांचा मोलाचा सहभाग आहे. जंगला मध्ये जाळरेषा काढणे, कायदयाचे धाक दाखवणारे माहीती फलक लावणे, टेहळणी टॉवर व फायर वॉचरच्या यांच्या मार्फत लक्ष ठेवणे, रेस्कू टीम, निसर्गप्रेमी यांच्या मदतीने लागलेली आग ताबडतोब आटोक्यात आणणे. संशईतांना नोटीस देणे, गुरेचारणाऱ्याची यादी तयार करणे, असे सुक्ष्मपने काम राबविले जावे यासाठी प्रत्येक परिक्षेत्र विभागामध्ये कार्यशाळा घेणे, ऑडीओ क्लिपच्या माध्यमातू प्रसार वाहीनी वरून प्रबोधन करणे,तंत्रज्ञानाचा वापर करून होणाऱ्या घटनांवर लक्ष ठेवणे. शाळा,महाविद्यालय यांच्यामधून वणवा निर्मूलन रॅलीचे नियोजन,’ वणवा निर्मूलन वन्यजीव संरक्षण शपथ म्हणवून घेणे. अशा विविध उपायांचा बारकाईने वापर झालेने गत सालामध्ये नुकसानीचे क्षेत्र कमी करण्यामध्ये यश आलेले आहे.
जंगली प्राण्यांचा अधिवास वणव्यामुळे नष्ट होत आहे.अन्न, पाणी याबरोबर त्यांचे घरही उद्ध्वस्त होत आहे आणि त्यामुळेच वन्यप्राणी मानवी वस्तीकडे वळले आहेत, आणि म्हणताहेत ‘कुणी घर देता का घर ?’ त्यांच्या येण्याने शेतपिकाचे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे जंगले टिकवणे ही काळाची गरज आहे. वणवा प्रतिबंधक मोहीम प्रभाविपणे राबवणेसाठी समाजप्रबेधन चळवळ भक्कम करणेचे अवाहन सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जी.एम. पाटील यांनी केलेआहे. या जनजागृती चळवळीच्या रामतीर्थआजरा येथे सुरु असलेल्या स्टॉलचे उद्घाटन, आजरा, तहसिलचे नायब तहसिलदार म्हाळसाकांत देसाई यांनी, वन विभागाचे वनपाल शकील मुजावर , सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष जी.एम. पाटील, प्रजापिता ब्रम्हाकुमारीच्या मनिषा बहनजीच्या, मंडल – अधिकारी कुरणे व सुंदर जाधव, देवर्डेचे उपसरपंच मारुती बुरुड देऊळवाडीचे उपसरपंच संजय सावंत युवा नेते अनिकेत कवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडला. या उपक्रमासाठी वन विभागाचे वनरक्षक तानाजी लटके, प्रियांका पाटील व वनविभागाचे कर्मचारी यांनी सहभाग घेतला
आजरा सेटरचे विनायक भाई, गंगाधर पाकले भाई,मालती बहनजी यांनी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याचे भरीव काम केले.
🛑मलिग्रे चाळोबा देवाची यात्रा ऊत्साहात संपन्न
आजरा.- प्रतिनिधी .

पिढ्यानं पिढ्या महाशिवरात्र दुसर्या दिवसी चाळोबा देवाची यात्रा भरली जाते. यावर्षी डोगरावर जाण्यासाठी रस्त्याची डागडूजी केल्याने बैल गाड्या, टूव्हीलर, ट्रक्टर ,चार चाकी वाहनांसह हजारो भाविकांनी सहभाग घेतला. या निमित्ताने मुंबई ग्रामस्थ यात्रेसाठी आवर्जून येतात. माहेरवासीनी हक्काने देवदर्शनासाठी उपस्थित राहतात. शहरातील गावातील यात्रे पेक्षा, निसर्गाच्या सान्निध्यात एक दिवस या निमित्ताने देवदर्शन घेतल्यानंतर आलेल्या मित्र व नातेवाईकांना भेटून, आपुलकीने खुशाली विचारत होते. यावेळी मलिग्रे महिला लेझीम व कागिनवाडी महिला लेझीमामुळे यात्रेची शोभा वाढवली. देवाची पुजा नैवद व गाह्राणे झाल्यानंतर
महाप्रसादाचे वाटप करणेत आले.