🛑स्मार्ट व प्रीपेड मीटर विरोधातील मोर्चासाठी हजारहून अधिक आंदोलन सहभागी होणार .- बैठकीत निर्णय
🛑भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा वतीने भारत बंद आजऱ्यात प्रतिसाद.
आजरा- प्रतिनिधी.

अदानी उद्योग समुहाला स्मार्ट व प्रीपेड मीटर बसवण्याचा ठेका देऊन गोरगरीब जनतेला लुटण्याचा धंदा बंद करण्यासाठी सोमवार दि ६ जानेवारी रोजी निघणाऱ्या मोर्चात हजारो कार्यकर्त्यांसह सहभागी होण्याचा निर्धार आज जनता बँकेच्या सभागृहात बोलावलेल्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती अल्बर्ट डिसोझा होते. वीज ग्राहक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजरा, गडहिंग्लज, चंदगड व भुदरगड तालुक्यातील वीज ग्राहकांचा मोर्चा निघणार असून हा मोर्चा मोठ्या संख्येने सहभाग घेऊन यशस्वी करण्याचा निर्धार आज करण्यात आला. यावेळी बोलताना वीज ग्राहक संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ संपत देसाई म्हणाले की स्मार्ट आणि प्रीपेड मीटरचा ठेका अदानीला देऊन गोरगरिबांना लुटण्याचा जणू परवानाच सरकारने अदानीला दिला आहे. एका बाजूला वीज ग्राहकांची लूट आणि दुसऱ्या बाजूला वीज कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुर्हाड कोसळणार आहे. त्यामुळे ही लढाई मोठ्या भांडवलदारासोबत असून ती आपल्याला नेटाने लढवावी लागेल. याविरोधात एक वादळ उठवावे लागेल, ते वादळ संपूर्ण महाराष्ट्रात घोंगवेल.
अल्बर्ट डिसोझा म्हणाले की आता रस्त्यावर उतरावे लागेल प्रत्येकाने जबाबदारी घेऊन घरोघरी जाऊन याचे गांभीर्य सांगावे जास्तीतजास्त माणसे कशी येतील यासाठी प्रयत्न करावेत. यावेळी कॉ शांताराम पाटील, तानाजी देसाई, कॉ संजय तरडेकर, युवराज पोवार, समीर चांद, दत्ता कांबळे डॉ रोहन जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. प्रकाश मोरुस्कर, नामदेव फगरे, दत्ता पाटील यांनीही सूचना मांडल्या. यावेळी रशीद पठाण, मारुती पाटील, मायकेल बारदेस्कर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. रवींद्र भाटले यांनी आभार मांडले.

🛑भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा वतीने भारत बंद आजऱ्यात प्रतिसाद.
आजरा.- प्रतिनिधी.

भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा वतीने भारत बंद आजऱ्यात प्रतिसाद मिळाला
दि ३१ डिसेंबर रोजी भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांच्या वतीने भारत बंद पुकारण्यात आला होता. या बंदचे विषय ओबीसीची जातीनिहाय जनगणना करणे, ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेणे, गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेले वक्तव्य, परभणीत संविधानाची विटंबना झालेली घटना व सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या, मराठा आरक्षण असे अनेक विषय होते. या भारत बंदला आजरा मधील वेगवेगळ्या आंबेडकरी संघटनांनी पाठिंबा दिलेला होता. त्यामध्ये प्रामुख्याने बहुजन मुक्ती पार्टी, सेक्युलर मुव्हमेंट, वंचित बहुजन युवा आघाडी, रिपब्लिकन सेना, इ. संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष बंदमध्ये सहभाग घेतला.
आजऱ्यातील व्यापारी वर्गाने स्वतःची दुकाने पूर्णपणे बंद ठेवून बंदला १००% उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच आजऱ्यातील बाजारपेठेतील कोणतेही दुकाने उघडण्यात आली नाहीत आणि बंद खूप चांगल्या पद्धतीने शांततेत पार पडला.. या बंदमध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजरा एसटी आगाराचा कारभार सुधारणेबाबत.- एसटी प्रवासी संघटनेचे निवेदन.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा एसटी आगाराचा कारभार सुधारणेबाबतएसटी प्रवासी संघटनेचे वतीने निवेदन.
देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. आजरा तालुक्याच्या दळण वळण सोईमध्ये वाढ होण्यासाठी सन १९९८ मध्ये आजरा एसटी आगाराची निर्मिती करण्यात आली. मात्र गेल्या २५ वर्षात काही वर्षाचा अपवाद वगळता एसटी आगाराच्या कारभाराबद्दल तालुक्याच्या जनतेने नाराजीचा सूर आहे. त्यामुळे आजरा एस.टी. आगाराचा कारभारात सुधारणा होण्याची गरज आहे. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यासोबत खाल्ले मागण्या केल्या आहेत. यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट.
१) आजरा तालुक्यात प्रवासी वाहतुकीसाठी एस.टी. वगळता इतर कोणतीही सुविधा नसल्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात एस.टी. मजबूत जाले तयार करावे.
२) कोरोना काळापूर्वी एस.टी.च्या तालुक्यातील फेरयांबाबत नागरिक काहीप्रमाणात समाधानी होते. त्यामुळे एसटी आगाराचे कोरोना पूर्वीचे वेळापत्रक सन २०१६-१७ पूर्वरत करावे.
३) सध्या एस.टी. आग्राकडे अपुर्या बसेस व कालबाह्य झालेल्या बसेस असल्यामुळे इथला कारभार चालवण्यासाठी डेपो. मनेजर ला अडचण येत आहेत. म्हणून आजरा आगारात नवीन २० बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात.

४) लांब पल्ल्याची विशेष करून मुंबई पुणे गाड्यांचे आरक्षण करण्याची सुविधा आजरा आगारात उपलब्ध करून द्यावेत.
५) आजरा बस स्थानक परिसर स्वच्छ राहण्यासाठी पूर्णवेळ सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी.
६) आजरा बस स्थानकाच्या सुरक्षिततेच्या कारणाकरिता आंबोली रस्त्यावरील बाजूला संरक्षक भिंत व ये जा करण्यासाठी लोखंडी ग्रीलची उभारणी करण्यात यावी,
७) कोकण व पणजी कडे जाणाऱ्या बस आजरा आजारातून सुरू करण्यात याव्यात.
८) कोल्हापुरातून आजाऱ्याकडे येण्यासाठी रात्री ९ नंतर बस फेरी सुरू करावी. ही फेरी गडहिंग्लज मार्ग असावी.
९) सकाळी ९.३० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान आजरा गडहिंग्लज विना थांबा फेरी सुरू करावी.
१०) आजरा कोल्हापूर विना थांबा फेरी सकाळच्या सत्रासाठी सुरू करावी.
